कणकवली, 17 सप्टेंबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज कणकवलीत आहे. यावेळी महाजनादेश यात्रा मार्गावर राष्ट्रवादीकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. सरकारवर टीका करणारे पोस्टर संपूर्ण कणकवलीमध्ये लावण्यात आले आहेत. यानंतर पोलिसांनी मध्यरात्री हे पोस्टर्स काढून टाकले असल्याची माहिती देण्यात आली आहे. दुपारी 2 वाजता भाजपाची ही महाजनादेश यात्रा कणकवलीत दाखल होईल.
नारायण राणेंच्या होम टाउनमध्ये ही यात्रा येणार असल्याने या यात्रेत मुख्यमंत्री नारायण राणेंच्या रखडलेल्या भाजपा प्रवेशाबद्दल काय बोलतात याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे नारायण राणेंच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे फलक हायवेवर लावलेले दिसून येतायत. पण दुसरीकडे भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी कणकवली विधानसभा कमळाच्या चिन्हावर भाजपा लढवणार असल्याच स्पष्ट केल्यामुळे कणकवलीत भाजपाचा संभाव्य उमेदवार कोण याबाबतही आजच्या सभेत मुख्यमंत्री संकेत देतात का याकडेही भाजपाच्या कार्यकर्त्यांच लक्ष लागलं आहे.
स्वाभिमान म्हणजे नक्की काय असतो पवारसाहेब? - उद्धव ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सामना संपादकीयमधून समाचार घेतला आहे. 'पक्ष सोडून जाणाऱ्यांनी त्यांचा स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे, असे शरद पवार म्हणतात. हा स्वाभिमान म्हणजे नक्की काय असतो पवारसाहेब?', असा सवाल उद्धव ठाकरेंनी त्यांना विचारला आहे.
इतर बातम्या - धक्कादायक! 'आईने बाबांना चाकूने मारलं', 6 वर्षांच्या मुलाचा नातेवाईकांना फोन
काय आहे आजचं सामना संपादकीय?
- पळपुट्यांना मतदार धडा शिकवतील, असे शरद पवार यांनी सांगितले आहे.
- ‘कोणी सोडून गेले त्याची काळजी करू नका. पक्ष सोडून जाणाऱ्यांनी त्यांचा स्वाभिमान गुंडाळून ठेवला आहे,’ असे शरद पवार म्हणतात.
- हा स्वाभिमान म्हणजे नक्की काय असतो पवारसाहेब? स्वत: पवारसाहेबांनी स्वाभिमानाच्या मुद्दय़ावर सोनियांबरोबर वाद केला. काँग्रेस पक्षात बंड केले. आज त्याच सोनियांबरोबर मागील दीड-दोन दशकांपासून त्यांचे राजकीय ‘गुप्तगू’ सुरू आहे.
इतर बातम्या - युतीवर वाद अद्याप मिटला नाही, शिवसेनेनं दिला नवा फॉर्म्युला!
शिवसेना किंवा भाजपातील काही मंडळी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत सामील करून घेतली तेव्हा या मंडळींनी स्वाभिमानाचे कोणते शिखर जिंकले होते? त्यांनी तेव्हाही स्वाभिमान वगैरे शब्दाची ऐशी की तैशीच केली होती.
- राष्ट्रवादीच्या रथावर सध्या स्वार झालेले डॉ. अमोल कोल्हे हे शिवसेनेचेच पार्सल आहे व ते तुमच्या रथावर चढल्याने स्वाभिमानाचे वजन वाढून रथाचा टायर पंक्चर झाल्याची बातमी नाही.
- पवारसाहेबांचे असे सांगणे आहे की, ‘‘मी माझ्या राजकीय कारकीर्दीच्या 52 वर्षांत 27 वर्षे सत्तेबाहेर होतो. सत्तेबाहेर राहून अधिक जोमाने काम केले. आता पक्षांतर करणारे विकासासाठी जात आहेत असे सांगतात तेव्हा गंमत वाटते!’’ पवारांना याबाबत गंमत वाटणे हीच मोठी गंमत आहे
इतर बातम्या - उलट्या काळजाची आई, 9 तासांआधी जन्मलेल्या बाळाला फेकलं काटेरी झुडप्यात!
- पवारसाहेब, तुम्ही आज ज्यांना पळपुटे म्हणत आहात ते काल कुठून तरी पळून किंवा फुटूनच तुमच्या तंबूत शिरले होते. आता तुमचा तंबूच भुईसपाट झाला. स्वाभिमानाचे नाव का घेता? वळणाचे पाणी वळणाला गेले.
विधानसभेआधी पवार काका-पुतण्यात भवगा वाद? पाहा SPECIAL REPORT
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा