'PM मोदींनी झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाबाबत बोलणी केलीच नाही', मलेशियाच्या पंतप्रधानांचा दावा

'PM मोदींनी झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाबाबत बोलणी केलीच नाही', मलेशियाच्या पंतप्रधानांचा दावा

मलेशियाचे पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी भारताने वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाची मागणी केल्याचा दावा फेटाळून लावला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : मलेशियाचे पंतप्रधान महातिर मोहम्मद यांनी भारताने वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाची मागणी केल्याचा दावा फेटाळून लावला आहे. झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीही बोलणी केली नाही,  असे विधान मोहम्मद यांनी केलं आहे. दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर असताना पंतप्रधान मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान महाथिर मोहम्मद यांची भेट झाली होती. महातिर मोहम्मद म्हणाले की,'कोणत्याही देशाला झाकीर नाईक त्यांच्याकडे नकोय. मी नरेंद्र मोदींची भेट घेतली. पण त्यांनी नाईकच्या प्रत्यार्पणासंदर्भात माझ्याकडे कोणतीही मागणी केली नाही. कदाचित ही व्यक्ती भारतासाठीही समस्या निर्माण करू शकते'.

स्थानिक मीडियासोबत संवाद साधताना महातिर मोहम्मद यांनी सांगितलं की,'नाईकनं कायद्याचं उल्लंघन केलंय. झाकीर नाईक या देशाचा नागरिक नाही. आधीच्या सरकारनं त्याला येथे राहण्याची परवानगी नाकारली होती. त्यामुळे त्याला या देशातील राजकारण आणि यंत्रणेवर बोलण्याची परवानगी नाही'.

वाचा :धक्कादायक! 'आईने बाबांना चाकूने मारलं', 6 वर्षांच्या मुलाचा नातेवाईकांना फोन

प्रत्यार्पणासंदर्भात भारतानं काय म्हटलं होतं?

रशिया दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मलेशियाचे पंतप्रधान महातिर मोहम्मद यांची भेट घेतली होती. यादरम्यान त्यांनी झाकीर नाईक यांच्या प्रत्यार्पणासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. दोन्ही नेत्यांनी भेटीनंतर परराष्ट्र सचिव यांनी माहिती दिली होती की, पंतप्रधान मोदींनी झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा उचलला. सोबत दोन्ही नेत्यांनी यावर सहमतीही दर्शवली की नाईक प्रकरण दोन्ही देशांसाठी खूप महत्त्वाचे आहे. तसंच दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी या मुद्यावर एकमेकांशी संपर्कात राहण्याचं म्हटलं होतं.

(वाचा : उलट्या काळजाची आई, 9 तासांआधी जन्मलेल्या बाळाला फेकलं काटेरी झुडप्यात!)

झाकीर नाईक फरार

झाकीर नाईक हा फरार असून त्याच्यावर दहशतवाद संबंधित गंभीर आरोप दाखल करण्यात आलेत. बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जुलै 2016 मध्ये नाईकनं देशाबाहेर पळ काढला होता. यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेने त्याच्यावर दहशतवाद संबंधित आरोप लावले.

(वाचा : 'दादा-दादा' म्हटल्यावरही नराधमांनी ओरबाडलं, तरुणीवर चौघांकडून सामूहिक बलात्कार)

VIDEO: चकाचक बाईक वापरणाऱ्या तरुणानं चोरलं हेल्मेट

First published: September 17, 2019, 1:05 PM IST
Tags: zakir naik

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading