• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • Belgaum Bypoll: देवेंद्र फडणवीस बेळगावात करणार प्रचार? लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये स्टार प्रचारक

Belgaum Bypoll: देवेंद्र फडणवीस बेळगावात करणार प्रचार? लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये स्टार प्रचारक

केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी (Suresh Angadi) यांचं निधन झाल्यानंतर बेळगाव लोकसभा पोट निवडणूक (Karnataka Belgaum Bypoll 2021) होत आहे. दरम्यान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) बेळगावात प्रचार करताना दिसण्याची शक्यता आहे.

  • Share this:
बेळगाव, 07 एप्रिल: सलग चार वेळा बेळगावचे खासदार राहिलेले केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी (Suresh Angadi) यांचं निधन झाल्यानंतर बेळगाव लोकसभा पोट निवडणूक (Karnataka Belgaum Bypoll 2021) होत आहे. येत्या 17 एप्रिल रोजी बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून 2 मे या दिवशी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं तर महत्त्वाचं ठरेलच पण त्याचबरोबर आणखी एका गोष्टीमुळे या निवणडणुकीकडे लक्ष वेधले गेले आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) बेळगावात प्रचार करताना दिसण्याची शक्यता आहे. बेळगावात सध्या लोकसभा पोट निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशावेळी फडणवीस प्रचारासाठी बेळगावात येण्याची शक्यता आहे. भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत देवेंद्र फडणवीसांचे नाव आहे. विशेष म्हणजे या यादीमध्ये असणारे हे एकमेव मराठी नाव असल्याचीही माहिती मिळते आहे. मात्र देवेंद्र फडणवीसांनी बेळगावामध्ये प्रचाराकरता येऊ नये, अशी काहींची भूमिका आहे. मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीची अशी भूमिका आहे. (हे वाचा-IPL 2021 : पैसे नसल्याने क्रिकेटचं प्रशिक्षण सोडलं, आयपीएलमुळे झाला करोडपती) भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीसाठी सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी (Managala Angadi) यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसतर्फे सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) रिंगणात आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून शुभम शेळके (Shubham Shelke) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मतांची विभागणी टाळण्यासाठी शिवसेनेचे के. पी. पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेत महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा दिला आहे. यामुळे बेळगाव मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळेल. (हे वाचा-भारतातील सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहीम 'संजीवनी' मध्ये सोनू सूद होणार सहभागी) दरम्यान, बेळगाव लोकसभा मतदारसंघांमध्ये एकूण आठ विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी बैलहोंगल आणि बेळगाव ग्रामीणमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, तर उर्वरित सहा मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे येणाऱ्या पोटनिवडणुकीत नेमकं काय होणार याकडे दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकचंही लक्ष असणार आहे.
First published: