जाहिरात
मराठी बातम्या / देश / पर्वतावर कशी गेली बिबट्याची नवजात पिल्लं? मेंढपाळांमुळे वाचला जीव

पर्वतावर कशी गेली बिबट्याची नवजात पिल्लं? मेंढपाळांमुळे वाचला जीव

पर्वतावर कशी गेली बिबट्याची नवजात पिल्लं? मेंढपाळांमुळे वाचला जीव

पर्वतावर कशी गेली बिबट्याची नवजात पिल्लं? मेंढपाळांमुळे वाचला जीव

हरियाणातील नूह जिल्ह्यातील कोटला डोंगरावरील अरवली पर्वतावर बिबट्याचे दोन महिन्यांचे पिल्लू आढळून आले.

  • -MIN READ Local18 Haryana
  • Last Updated :

मेवात, 16 जुलै : बिबट्याला बकऱ्यांची शिकार करताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल, पण बिबिट्या सारख्या प्राण्याला तुम्ही बकरीच दूध पिताना पाहिलंय का? हरियाणातील नूह जिल्ह्यातील कोटला डोंगरावरील अरवली पर्वतावर बिबट्याचे दोन महिन्यांचे पिल्लू आढळून आले. अरवली डोंगर कोटला किल्ल्याजवळ संध्याकाळी जेव्हा दोन मेंढपाळांना विचित्र आवाज ऐकू आला तेव्हा त्यांनी जवळ जाऊन पहिले असता तेथे त्यांना बिबट्यांची दोन लहान पिल्ले आढळली. मेंढपाळांनी त्या लहान पिल्लांना गावातील घरी आणले. बिबट्याची दोन्ही पिल्ले भुकेलेली होती. तेव्हा गावकऱ्यांना पिल्लांची भूक भागवण्याचे साधन दिसत नसल्याने त्यांनी शेळीच्या कासेचे दूध बिबट्याच्या पिल्लांना पाजण्यास सुरुवात केली.  पिल्लांची भूक शमल्यानंतर गावकऱ्यांनी पोलीस आणि वनविभागाला याची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने गावात पोहोचून बिबट्याच्या दोन्ही पिल्लांना ताब्यात घेतले.

News18लोकमत
News18लोकमत

वनविभागाने दगडी मचाण बनवून दोन्ही पिल्लांना जंगलाच्या मध्यभागी सुखरूपपणे सोडले. वननिरीक्षक राजेश चहल यांनी माहिती दिली की, दोन्ही पिल्ल्यांच्या आईचा म्हणजेच मादी बिबट्याचा शोध सुरू करण्यात आला आहे कारण ही पिल्ले दोन-तीन दिवसांची असल्याचे दिसून येत आहे. गावकऱ्यांनी देखील मादी बिबट्याला तिच्या दुसऱ्या पिल्लांसोबत पाहिल्याने वनविभागाने त्यांची शोध मोहीम सुरु केली आहे. 800 वर्ष जुन्या मंदिराची मणिधारी नाग करतो रक्षा, दर्शनासाठी लागते मोठी रांग जोपर्यंत बिबट्याच्या लहान पिल्लांची आई सापडत नाही, तोपर्यंत वनविभागाची टीम शावकांची काळजी घेणार असल्याचे राजेश चहल यांनी सांगितले. पिल्लांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. आत्तापर्यंत मादी बिबट्याने हल्ला केल्याचे वृत्त मिळालेले नाही ही दिलासादायक बाब आहे. कारण जिथे ही दोन पिल्ले सापडली आहेत, तिथे राजस्थान आणि हरियाणा या दोन्ही राज्यांतील लोक पायी ये-जा करत असतात. अशा स्थितीत मादी बिबट्या तिची पिल्ले न मिळाल्याच्या रागात कोणावरही हल्ला करू शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात