Home /News /national /

चमत्कार! नदीतून वर आलं लुप्त झालेलं पुरातन मंदिर; महानदीत सापडला 500 वर्षांपूर्वीचा वारसा

चमत्कार! नदीतून वर आलं लुप्त झालेलं पुरातन मंदिर; महानदीत सापडला 500 वर्षांपूर्वीचा वारसा

ओडिशातल्या महानदीमध्ये सुमारे 500 वर्षांपूर्वी लुप्त झालेलं एक भव्य पुरातन मंदिर अचानक वर आलं आहे. या बुडलेल्या मंदिराचा शोध अभ्यासकांच्या एका गटाला लागला आहे.

    कटक (ओडिशा), 16 जून : ओडिशातल्या महानदीमध्ये अनेक वर्षांपूर्वी लुप्त झालेलं एक भव्य पुरातन मंदिर अचानक वर आलं आहे. या बुडलेल्या मंदिराचा शोध अभ्यासकांच्या एका गटाला लागला आहे. सुमारे 500 वर्षांपूर्वीचं हे मंदिर असावं, असं Indian National Trust for Art and Cultural Heritage (Intach)च्या पुरातत्त्व अभ्यासकांच्या गटाने म्हटलं आहे. इसवीसनाच्या 15 व्या शतकातलं किंवा 16 व्या शतकाच्या सुरुवातीला हे मंदिर पुराच्या पाण्यात बुडलं असावं. या मंदिराच्या शिखर आणि मस्तक (शिखर) शैलीच्या बांधकामावरून अभ्यासकांना ते 500 वर्षांपूर्वीचं असावं, असा अंदाज बांधला आहे. ओडिशातल्या कटक शहराजवळ महानदीमध्ये हे पुरातन मंदिर सापडलं आहे. नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेजची (INTACH)टीम या बुडालेल्या मंदिराचा अनेक काळापासून शोध घेत होती. शेवटी ओडिशातल्या कटक शहराजवळ पद्मावती नावाच्या गावात बैदेश्वरजवळच्या नदीत मंदिराच्या वरचा भाग दृष्टीस पडला, असं INTACH चे प्रकल्प सहायक दीपककुमार नायक यांनी सांगितलं.  वाचा - धक्कादायक! महिला अधिकाऱ्यांकडून केली दारूविक्री, दुकानांबाहेर लागल्या लांबच रांग महानदीच्या या भागात उन्हाळ्याच्या दिवसात नदीचं पाणी ओसरलं की, उंचवट्यासारखा काही भाग दिसत असे. 11 वर्षांपूर्वी मंदिराच्या शिखराचा भाग दिसला होता. आता पुन्हा एकदा तो वर आला आहे.  इथेच मंदिर असावं, असा अभ्यासकांचा कयास होता. पद्मावती गावकऱ्यांच्या मते, इथे 22 मंदिरं पाण्याखाली आहेत. 200-300 वर्षांपूर्वी महानदीचा प्रवाह बदलला. त्यामुळे हा अख्खा मंदिर समूह पाण्याखाली गेला, असं मानलं जातं. मागच्या वर्षी महानदी खोऱ्यातल्या वारसा वास्तूंच्या अभ्यासाचा प्रकल्प त्यांनी हातात घेतला आणि हे पुरातन मंदिर नेमकं हुडकून काढलं. एवढ्या वर्षांपूर्वीचं मंदिर नक्षीकामाच्या खांबासह नदीच्या प्रवाहाखाली सापडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. प्राचीन भारतातली शिल्पकला आणि संस्कृतीचा नवा वारसा यानिमित्ताने हाती लागला आहे. अन्य बातम्या कोरोनामुळे इस्रोने महत्त्वाकांक्षी 'गगनयान' प्रकल्पाबाबत घेतला मोठा निर्णय हमीद अली ऐवजी हनीफ अलीला मिळाला डिस्चार्ज आणि...
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    पुढील बातम्या