कानपूर, 22 मे : लॉकडाऊनच्या काळात अनेक घटना अशा घडल्या आहेत ज्या आश्चर्यकारक आहेत. लॉकडाऊनमुळे लग्नंही रखडली तर काहींनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत लग्न केलं. दरम्यान, उत्तर प्रदेशातील कानपूर इथं एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. रस्त्याच्या कडेला भीक मागून जीवन जगणाऱ्या तरुणीच्या प्रेमात तरुण पडला. हा तरुण फुटपाथवरील लोकांना जेवण वाटत होता. त्यावेळी मुलीच्या प्रेमात पडला आणि थेट लग्नच केलं.
गरीबीमुळे तरुणीला एकवेळचं जेवण मिळणं कठीण होतं. त्यामुळे फुटपाथवर भिकाऱ्यांसोबत बसून ती दिवस ढकलत होती. या लोकांना तरुण दररोज जेवण पुरवत असे. शेवटी तिच्याशीच लग्न करण्याचा निर्णय त्याने घेतला. अनेकांनी तरुणाच्या या निर्णयाचं कौतुक करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
तरुणीचे वडील जिवंत नाहीत तर आईला पॅरालिसिस झाला आहे. भाऊ आणि वहिनीने तिला मारहाण करून घरातून बाहेर काढलं होतं. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात खाण्यासाठी ती फुटपाथवर भिकाऱ्यांसोबत लाइनमध्ये उभा असायची. अनिल नावाचा तरुण तो जिथं काम करायचा त्यांच्यासोबत सर्वांना जेवण वाटण्यासाठी यायचा.
हे वाचा :
आर्थिक संकटाने घेतला बळी; मुंबईहून सायकलवर घरी परतलेल्या मजुराची आत्महत्या
जेवण वाटताना अनिलला तरुणीबद्दल समजलं. त्याच काळात अनिलचं तरुणीवर प्रेम बसलं आणि त्याने तरुणीला लग्नाची मागणी घातली. अनिल प्रॉपर्टी डिलरकडे ड्रायव्हरची नोकरी करतो. अनिलचं लग्न लावून देण्यात त्याचे मालक लालता प्रसाद यांनी महत्वाची भूमिका बजावली.
हे वाचा : पाकिस्तानच्या विमान अपघातात प्रसिद्ध मॉडेलने गमावला जीव
लालता प्रसाद यांनी सांगितलं की, अनिल जेवण वाटण्यासाठी आमच्यासोबत असायचा. त्यातून मुलीबद्दल त्याला आपुलकी वाटू लागली. तेव्हा त्याच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर तो स्वत: जेवण बनवून द्यायला जावू लागला. शेवटी त्याच्या वडिलांसोबत बोलून दोघांचे लग्न लावून दिले.
हे वाचा :
लॉकडाऊनमध्ये कसंबसं गाव गाठलं, आता उघड्यावर क्वारंटाइन होण्याची वेळ मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.