भोपाळ 6 जुलै: घरात झालेल्या एका लहानशा भांडणामुळे एक कुटुंबच उद्धवस्त झालं. मध्य प्रदेशातल्या छत्तरपूर इथं हा प्रकार घडला. या घटनेने सगळं शहर हादरून गेलं आहे. घरात 10 रुपयांची आणलेली भेळ काय दिली नाही यावरून महिलांमध्ये भांडण झालं. त्यात घरातले सर्व पुरूष सहभागी झाले. त्यातून भांडण एवढं विकोपाला गेलं की लहान भावांनी मिळून मोठ्या भावाची हत्या केली. छत्तरपूरमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबात हा प्रकार घडला. बाहेर गेलेल्या सुनील अहिरवार याने आपल्या मुलांसाठी 10 रुपयांची भेळ घेतली. तो ती भेळ घरी घेऊन आला आणि आपल्या मुलांना दिली. ही भेळ आपल्याला मुलांना का दिली नाही म्हणून सुनीलच्या लहान भाऊ असलेल्या राजूच्या बायकोने वाद घातला. त्यावरून महिलांचं भांडण झालं. महिलांचं भांडण प्रचंड वाढलं. त्याच्यातही हाणामारी होणार असं दिसताच या प्रकरणाला वेगळचं वळण लागलं. हा वाद वाढल्यानंतर त्यात पुरुषही सहभागी झाले. ते भांडण एवढं विकोपाला गेलं की राजूने रागाच्या भरात मोठा भाऊ सुनीलच्या डोक्यावर फावड्याने घाव घातला. त्यात सनीलचा मृत्यू झाला. त्यानंतर सुनीलच्या बायकोने पोलिसांमध्ये जाऊन तक्रार केली. सेल्फीचा मोह नडला! 5 पैकी दोघांना जलसमाधी तर तिघे बचावले थोडक्यात हा घाव एवढा मोठा होता की सुनील जागीच कोसळला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. या घटनेने सगळं घरच सुन्न झालं. घरातलं भांडण बाहेर ऐकून गेल्याने लोकही काय झालं म्हणून बघायला आहे तेव्हा त्यांना धक्काच बसला. सुनील रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. एकतर्फी प्रेमातून नववधूची दिवसाढवळ्या हत्या, ब्यूटी पार्लरमध्ये घुसून चिरला गळा पोलिसांनी राजू आणि घरातल्या काही मंडळींना ताब्यात घेतलं आहे. एका साध्या भेळमुळे घरातल्या कर्ता पुरुषाचा जीव घेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







