कन्नौज, 31 डिसेंबर : अत्तर व्यापारी पियुष जैनवर कारवाई केल्यानंतर उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये परफ्यूमच्या व्यापाऱ्यांवर छापेमारी सुरू आहे. पियुष जैन (Piyush Jain News) याच्या मुसक्या आवळल्यानंतर आता आयकर विभागाने परफ्यूम व्यापारी आणि समाजवादी पक्षाचे आमदार पुष्पराज जैन उर्फ पंपी जैन (Pushpraj Jain News) यांच्या घरावर आणि ठिकाणांवर छापे टाकले. इन्कम टॅक्सच्या मुंबई युनिटने ((IT Raid) ही शोध मोहीम हाती घेतल्याचे सांगण्यात येत आहे. पुष्पराज जैन यांच्या घरावर आणि कारखान्यांवर हा छापा अशा वेळी पडत आहे जेव्हा सपा अध्यक्ष अखिलेश यादव आज कन्नौजमध्ये उपस्थित असून दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत. पुष्पराज जैन यांच्यावरील कारवाईमुळे सपा आता भाजपवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. पियुष जैन यांच्याशी काही संबंध आहे का? पुष्पराज जैन हे कन्नौजचे प्रसिद्ध परफ्यूम व्यापारी आहेत. पियुष जैन यांच्यावर छापे टाकले जात होते, तेव्हा त्यांचं नावही अनेक साध्यर्मांमुळे चर्चेत होते. वास्तविक, पियुष जैन यांचे कन्नौजमध्ये जिथे घर आहे, तिथे पुष्पराज जैन यांचेही घर आहे. दोघांमध्ये साम्य इतके आहे की नावाच्या पहिल्या अक्षरापासून (इंग्रजी अक्षर पी), आडनाव (जैन) पासून व्यवसाय (परफ्यूम) आणि गल्ला सुद्धा एकच आहे. यामुळेच जेव्हा पीयूष जैन यांच्यावर छापा टाकण्यात आला तेव्हा त्यांचे नावही यूपीच्या राजकीय वार्यात वाहू लागले. मात्र, पुष्पराज जैन हे पूर्णपणे समाजवादी पक्षाशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. समाजवादी पक्षाचे आमदार पुष्पराज जैन यांनीच समाजवादी परफ्युम लाँच केला होता. कोण आहेत पुष्पराज जैन? पुष्पराज जैन यांचे विभागीय कार्यालय मुंबईत आहे. त्याचा परफ्यूमचा व्यवसाय मध्यपूर्वेतील देशांमध्ये पसरलेला आहे. 60 वर्षीय पुष्पराज जैन हे कन्नौजमधील प्रसिद्ध परफ्यूम व्यापारी आहेत. त्यांच्याकडे पेट्रोल पंप आणि कोल्ड स्टोरेज युनिट आहे. शेतीतूनही त्यांचं उत्पन्न येतं. मुंबईत घर आणि ऑफिसही आहे. काही काळापूर्वी अखिलेश यादव यांनी ‘समाजवादी अत्तर’ नावाचा परफ्यूम लॉन्च केला होता. यावेळी एसपी एमएलसी पुष्पराज जैन देखील उपस्थित होते, कारण त्यांनी हा परफ्यूम तयार केला होता. Pushparaj Jain IT Raid: उत्तर प्रदेशनंतर मुंबईतही आयकर विभागाची छापेमारी, 4 बँक खात्यांची झडती सुरू शिक्षण आणि मालमत्ता.. 2016 मध्ये त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, पुष्पराज आणि त्यांच्या कुटुंबाकडे 37.15 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि 10.10 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नसून कन्नौजमधील स्वरूप नारायण इंटरमीडिएट कॉलेजमध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. पियुष जैन यांच्यावर छापा टाकला असता, माझा पियुष जैनशी काहीही संबंध नाही, असे पुष्पराज म्हणाले होते. पियुष जैन हा माझ्यासारखाच समाजातील आहे ही सर्वसामान्य बाब आहे. जर त्याच्यावर छापे टाकले गेले असतील तर तो स्वत: हाताळेल, असे पुष्पराज त्यावेळी म्हणाले होते. मध्यपूर्वेतील देशांमध्ये व्यवसायाचा प्रसार पुष्पराज जैन 2016 मध्ये इटावा-फर्रुखाबाद येथून एमएलसी म्हणून निवडून आले होते. ते प्रगती अरोमा ऑइल डिस्टिलर्स प्रायव्हेट लिमिटेडचे सह-मालक आहेत. 1950 मध्ये त्यांचे वडील सावलाल जैन यांनी या व्यवसायाची सुरुवात केली होती. पुष्पराज आणि त्यांचे तीन भाऊ कन्नौजमध्ये व्यवसाय करतात आणि एकाच घरात राहतात. एमएलसी पुष्पराज यांचे मुंबईत घर आणि कार्यालय आहे, तेथून ते मुख्यतः मध्य पूर्वेतील जवळपास 12 देशांमध्ये निर्यातीचे व्यवहार करतात. त्यांच्या तीन भावांपैकी दोन भाऊ मुंबईच्या ऑफिसमध्ये काम करतात तर तिसरा त्यांच्यासोबत कन्नौजमध्ये एका मॅन्युफॅक्चरिंग सेटअपवर काम करतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.