उधव कृष्ण (पटणा), 08 मार्च : खुन्नस… या शब्दाने कित्येकांचे नुकसान झाल्याचे आपण पाहिले असेल. अनेक वेळा या एका शब्दावरून लोक स्वतःचे नुकसान करून घेतलेल आपण ऐकलं असेल. परंतु तुम्हाला खुन्नस या शब्दाने फायदा झाल्याचे तुम्ही ऐकलं नसेल तर ही गोष्ट फायद्याची आहे. आम्ही अशा व्यक्तीबद्दल बोलत आहोत ज्याला खुन्नस देण्यात आला आणि स्वतःची डेअरी स्थापन केली, जी आज कोटीत उलाढाल करत आहे. विशाल आर्यन या युवकाने ही क्रांती केली आहे. तो बिहारमधील पाटणाचा रहिवासी आहे.
पाटणा शहरातील छोटे नागला येथे कान्हा डेअरी चालवणारे विशाल आर्यन सांगतो की डेअरी सुरू करण्याची कहाणी खूप अनोखी आहे. पूर्वी तो दुग्ध संस्थेत एका फर्ममध्ये वितरक म्हणून काम करत होता. एकदा ग्राहकांच्या मागणीनुसार कंपनीने पुरवठा न केल्याने त्याचा डेअरी कंपनीच्या अधिकाऱ्याशी वाद झाला. त्यातून त्याने स्वतःची डेअरी उघडण्याचा निर्णय घेतला. विशाल अगदी आनंदाने सागतो की अल्पावधीत मला मोठा प्रतिसाद मिळाला आणि आज कोट्यावधी रुपयांची उलाढाल करणारी डेअरी सुरु झाली आहे.
Women’s Day 2023: कधी उंबरठाही न ओलांडणारी ‘ती’ सांभाळते गावचा कारभार, पाहा Videoविशालचा दावा आहे की इतर कंपन्यांच्या तुलनेत आमची उत्पादने बाजारात कमी दिसतील. परंतु गुणवत्तेचा प्रश्न येतो तेव्हा आम्हीच अग्रेसर असू एवढी आम्ही खात्री देतो. या बाबतीत आम्ही कधीही तडजोड करत नाही. तसेच आम्हाला दियारा भागातून शुद्ध दूध पुरवठा होतो यामुळे आमचे प्रोडक्ट उत्तम असते. यामुळे आमच्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये दुधाचा जास्त वापर केला जातो. तर चांगल्या मालामुळे उत्पादनाचा दर्जाही चांगला राखण्यात आम्ही यशस्वी झालो आहे.
मिस्टी दह्यापासून लस्सीपर्यंत, मिठाईपासून दह्याच्या मोठ्या बादल्यांपर्यंत प्रत्येक गोष्टीचा दर्जा तो स्वतः तपासतो, ते बनवताना अन्न सुरक्षा नियमांचीही पूर्ण काळजी घेतली जाते. विशालच्या म्हणण्यानुसार, बाजारात सर्व उत्पादने एमआरपीनुसार विकली जातात. तर वितरकांचे दर त्यापेक्षा खूपच कमी आहेत.
कचरा वेचणाऱ्या महिला बनल्या लघुउद्योजक, पाहा कसा केला हा प्रवास Videoविशाल सांगतो की, कान्हा डेअरी एका वर्षात सुमारे 1 कोटींची उलाढाल करते. तो त्याच्या फर्मच्या विस्तारासाठी वितरकाला चांगली सूट देखील देतो. तो मोठ्या कार्यक्रमांसाठी आपले पदार्थ देत असतो यासाठी 6206815727या क्रमांकावर संपर्क साधू शकता.