Home /News /national /

Jyotishacharya Murder : प्रसिद्ध ज्योतिषी चंद्रशेखर यांची हत्या, शिष्याच्या वेशात आलेल्या दोघांनी केले 70 हून अधिक वार

Jyotishacharya Murder : प्रसिद्ध ज्योतिषी चंद्रशेखर यांची हत्या, शिष्याच्या वेशात आलेल्या दोघांनी केले 70 हून अधिक वार

चंद्रशेखर गुरुजी मूळचे बागलकोटचे होते आणि काही कौटुंबिक कामाच्या निमित्ताने हुबळी येथे आले होते.

    हुबळी, 5 जुलै : कर्नाटक राज्यातील हुबळीमध्ये (Jyotish Murder in Hubli) अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी शिष्याच्या वेशात आलेल्या राक्षसी प्रवृत्तीच्या दोघांनी प्रसिद्ध ज्योतिषाचार्य चंद्रशेखर (Jyotishacharya Chandrashekhar) यांच्या चाकूने वार करत त्यांची हत्या केली. हुबळी येथील प्रेसिडेंट हॉटेलमध्ये पाहुण्यांना भेटण्यासाठी ज्योतिषाचार्य हॉटेलच्या लॉबीमध्ये आले होते. याच वेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला करत आपला डाव साधला. (Jyotishacharya Chandrashekhar Murder) काय आहे संपूर्ण घटना - चंद्रशेखर गुरुजी मूळचे बागलकोटचे होते आणि काही कौटुंबिक कामाच्या निमित्ताने हुबळी येथे आले होते. सरल वास्तू नावाने म्हणून प्रसिद्ध असलेले ज्योतिषाचार्य चंद्रशेखर यांच्या हत्येची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या फुटेजमध्ये गुन्हेगार हत्या केल्यानंतर सरळ पळताना दिसत आहेत. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. तसेच पुढील तपासाला सुरुवात केली आहे. आधी चरणस्पर्श आणि नंतर... हल्लेखोरांनी आधी ज्योतिषाचार्य चंद्रशेखर यांच्या पायाला स्पर्श केला आणि नंतर चाकूसारख्या धारदार शस्त्राने एकामागून एक हल्ला केला. हल्लेखोरांनी ज्योतिषाचार्य चंद्रशेखर यांच्यावर तब्बल 70 वार केले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. हेही वाचा - लज्जास्पद घटना! भाजपच्या महिला खासदाराचं सामान गेस्ट हाऊसबाहेर फेकलं, अंतर्वस्त्रांचाही समावेश, Video व्हायरल या खळबळजनक घटनेतील हल्लेखोर कोण होते आणि हत्येमागील कारण काय होता? याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. पोलीस या प्रकरणाचा संपूर्ण तपास करत आहेत. हॉटेल आणि परिसरातील चौकशीसह पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. चंद्रशेखर गुरू हे मूळचे बागलकोटचे असून काही परिवाराच्या कामाच्या निमित्ताने ते हुबळी येथे आले होते.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Karnataka, Murder

    पुढील बातम्या