Home /News /national /

शपथ घेतल्याच्या काही तासात ज्योतिरादित्य शिंदेंच्या Facebook वरुन मोदींविरोधात गरळ, काय आहे कारणं?

शपथ घेतल्याच्या काही तासात ज्योतिरादित्य शिंदेंच्या Facebook वरुन मोदींविरोधात गरळ, काय आहे कारणं?

Union cabinet expansion : केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे मोदी सरकारमध्ये सामील झाल्याच्या काही तासात हा प्रकार समोर आला.

    मध्य प्रदेश, 8 जुलै: केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे मोदी सरकारमध्ये (Union cabinet expansion) सामील झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचा फेसबुक अकाऊंट हॅक (Jyotiraditya Shinde Facebook account hacked) झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. सांगितलं जात आहे की, कोणी अज्ञात व्यक्तीने रात्री 12.23 वाजता त्यांच्या फेसबुक वॉलवर पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील आक्रमक भाषण केलेला जुना व्हिडीओ अपलोड (Uploaded old videos against Modi) केला आहे. जेव्हा शिंदे काँग्रेसमध्ये होते तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. ही बातमी समोर आल्यानंतर सायबर टीम सक्रिय झाली आहे. त्यानंतर काही मिनिटातच हॅकिंग थांबविण्यात आलं, सोबतच अपलोड केलेला जुना व्हिडीओदेखील हटविण्यात आला. जेथून शिंदेचं फेसबुक अकाऊंट हॅक केलं होतं, त्याबाबतही माहिती मिळाल्याचं सांगितलं जात आहे. 2020 मार्चमध्ये शिंदेंनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता. राज्यसभेचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात शपथ घेतली. त्यांच्यावर सिव्हील एव्हिएशनची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर रात्री 12.23 वाजता त्यांचं फेसबुक अकाऊंट हॅक करण्यात आलं. हॅकरने त्यांच्या वॉलवर जुने फोटो आणि व्हिडीओ अपलोड केले. यामध्ये असे काही व्हिडीओ आहेत, ज्यात शिंदेंनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. हे ही वाचा-शपथ घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी केंद्रीय मंत्र्यांना मोदींकडून महत्त्वाचे आदेश फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याच्या वृत्ताने खळबळ केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याच्या वृत्ताने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अद्यापही शिंदेंच्या अकाऊंटवर सायबर टीम लक्ष ठेवून आहे. भोपाळमधील शिंदे समर्थक नेते कृष्णा घाटगे यांनी याला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितलं की, तातडीने हॅकिंग थांबविण्यात आलं. काही मिनिटाचं जे फोटो आणि व्हिडीओ अपलोड केले होते, ते हटविण्यात आले.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Jyotiraditya scindia, Madhya pradesh, Modi government, Union cabinet

    पुढील बातम्या