नवी दिल्ली, 8 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) बुधवारी रात्री पार पडला. यंदा एकूण 43 जणांच्या नावाची निश्चित झाली आहे. या नव्या चेहऱ्यांमध्ये वकील,(Lawyers) डॉक्टर (Doctors) आणि इंजिनिअर्सचं (Engineers) प्रमाण लक्षणीय असल्याचं चित्र आहे. तर या मंत्रिमंडळ विस्तारात तब्बल 4 माजी मुख्यमंत्र्यांचाही (Ex Chief Ministers) समावेश आहे. दरम्यान नरेंद्र मोदींनी नवनियुक्त केंद्रीय मंत्र्यांचा महत्त्वाची सूचना दिली आहे. पहिली गोष्ट म्हणजे मंत्र्यांनी 15 ऑगस्टपर्यंत दिल्लीत थांबाव, मंत्र्यांनी आपापल्या खात्यांची माहिती घ्यावी आणि मंत्रालयाचं कामकाज लवकर सुरू करावं. दुसरी बाब म्हणजे माध्यमांसोबत जास्त बोलू नका (not to speak with media) असाही सल्ला यावेळी मोदींनी नवनियुक्त केंद्रीय मंत्र्यांना दिला आहे. यातील अनेक चेहरे तर राज्य सरकारविरोधात वारंवार पत्रकार परिषदा घेत असतात. त्यामुळे या नेत्यांना मोदींनीच सूचना दिली असल्यामुळे ते पाळणे अनिवार्य आहे. (Modis order to newly appointed Union Ministers not to speak with media) न्यूज एजन्सी एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात एकूण 43 जणांचा समावेश करण्यात येणार आहे. हे सर्वजण आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये काही नेते असे आहेत ज्यांच्याकडे राज्यमंत्रिपद होते आणि त्यांना आता कॅबिनेट मंत्रिपद देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.
43 leaders to take oath today in the Union Cabinet expansion. Jyotiraditya Scindia, Pashupati Kumar Paras, Bhupender Yadav, Anupriya Patel, Shobha Karandlaje, Meenakshi Lekhi, Ajay Bhatt, Anurag Thakur to also take the oath. pic.twitter.com/pprtmDu4ko
— ANI (@ANI) July 7, 2021
हे नेते कॅबिनेट विस्तारासाठी दिल्लीत दाखल