ग्वालियर, 27 फेब्रुवारी: गेल्या 116 वर्षांपासून मध्यप्रदेशातील ग्वालियरमध्ये व्यापारी मेळ्याचं आयोजन केलं जातं. यावर्षीही या मेळ्याचं अगदी उत्साहात आयोजन करण्यात आलं आहे. देशभरातील अनेक लोक या ऐतिहासिक व्यापारी मेळ्याला भेटी देत असून आनंद लुटताना दिसत आहेत. आता या व्यापारी मेळ्याला राज्यसभेचे सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचे नेते ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांनी देखील हजेरी लावली आहे. एकेकाळी ग्वालियरचे राजे असणाऱ्या शिंदे यांनी या व्यापारी मेळ्याला उपस्थिती दर्शवल्याने उपस्थित अनेकांना प्रचंड आनंद झाला आहे. यावेळी ज्योतिरादित्य शिंदे हे अगदी सामान्य व्यक्तीप्रमाणे मेळ्यात फिरले आहेत. दरम्यान त्यांनी अनेक लहान लेकरांसोबत, महिलांसोबत, मुलींसोबत तसेच मेळ्यात खेळण्याची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यासोबत प्रेमाने विचारपूस करत गप्पा मारल्या आहेत. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
यावेळी ज्योतिरादित्य शिंदे यांनी कोरोना वाढता धोका लक्षात घेवून मास्क परिधान केला होता. तसेच त्यांनी अनेकांना मास्क परिधान करण्याचा प्रेमळ सल्लाही दिला आहे. तर यातील काही लहान लेकरांना शिंदे यांनी स्वतः मास्क खरेदी करून दिला आहे.
ग्वाल्हेरच्या मेळ्यातला VIDEO: खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी या प्रसिद्ध जत्रेला भेट दिली. लहान मुलांसह सगळ्यांना मास्क लावण्याचं आवाहन करताना ते दिसले. pic.twitter.com/gH391qmtnM
— News18Lokmat (@News18lokmat) February 27, 2021
विशेष म्हणजे ज्योतिरादित्य शिंदे यांनी या मेळ्यातील आकाश पाळण्याचा मनमुराद आनंद लुटला आहे. त्यांना पाहण्यासाठी अनेक लोकांनी गर्दी केली होती. हे ही वाचा - या राज्यात बनेल देशातलं पहिलं खेळणी निर्मिती क्लस्टर, 1लाख लोकांना मिळेल रोजगार या ऐतिहासिक मेळ्याची सुरुवात ज्योतिरादित्य शिंदे यांचे वडील माधवराव शिंदे (Madhavrao Scindia) यांनी केली होती. त्यांचा हा ऐतिहासिक वारसा गेल्या 116 वर्षापासून जपला गेला आहे. त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांसाठी या व्यापारी मेळ्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे या मेळ्याला भविष्यात आणखी भव्य रुप देण्याची घोषणाही ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली आहे.