नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : देशातील पाहिलं खेळणी क्लस्टर कर्नाटकात उभं राहणार आहे. हे बंगळुरूपासून 365 किलोमीटर दूर असलेल्या कोप्पल जिल्ह्याच्या भानुपुर गावात उभं राहणार आहे.(First toy making cluster of India)
याची माहिती कर्नाटक सरकारनं शनिवारी दिली. याची संपूर्ण निर्मिती यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल अशी आशा आहे. कर्नाटक सरकारने सांगितल्यानुसार, क्लस्टरच्या 400 एकर जमीनीपैकी 300 एकरमध्ये विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) असेल जे केवळ निर्यातीसाठी समर्पित केलेलं असेल. बाकीच्या क्षेत्रातून देशांतर्गत बाजारासाठी उत्पन्न काढलं जाईल. हे तयार करण्यात जवळपास 5000 कोटी रुपये खर्च येणार आहे.(first toy manufacturing cluster in Karnatka)
1 लाख लोकांना मिळेल रोजगार (toy making cluster in Koppal district of Karnataka)
कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा म्हणाले, की या क्लस्टरमध्ये खेळणेनिर्मितीचे 100 हून अधिक युनिट्स असतील. यातून जवळपास 25,000 हून अधिक प्रत्यक्ष आणि 1 लाखाच्या आसपास अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. ते म्हणाले, की खेळणी निर्मिती उद्योग हा श्रमिकांच्या कष्टावर आधारलेला आहे. यात बहुतांश कष्टकरी महिला असतात. त्यामुळं कोप्पलमध्ये सुरू होणारं हे खेळणी क्लस्टर महिला सक्षमीकरणाकडे पडलेलं एक मोठं पाऊल आहे.
हेही वाचा- India Toy Fair: खेळणी उद्योगात दडलेली ताकद ओळखून ती वाढवणं आवश्यक : पंतप्रधान मोदी
येडियुरप्पा हेसुद्धा म्हणाले, की ज्या महिला रोज 200 रुपये कमावत आहेत त्या रोज 600 रुपये कमावू शकतील. खेळणी निर्मिती उद्योगात महिलांचं मोठं योगदान राहिलेलं आहे.
महिला सक्षमीकरणास चालना मिळेल (toy making and woman empowerment in India)
ते म्हणाले, की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या 'व्होकल फॉर लोकल'च्या दृष्टिकोणानुसारच खेळणी निर्मितीला चालना देण्यास कोप्पल भारतातील पाहिलं खेळणी निर्मिती क्लस्टर बनेल.(vocal for local)
हेही वाचा राहुल गांधींच्या बायसेप्सवर जनता फिदा; हाच सर्वात फिट नेता असल्याचा दिला किताब
9000 कोटी अमेरिकी डॉलरचा आहे खेळणी उद्योग
अध्यक्ष अरविंद मलिंगेरी सांगतात, की जागतिक स्तरावर खेळणी उद्योग 9000 कोटी डॉलरचा आहे. आणि भारतीय बाजाराचा आकार 1.7 बिलियन अमेरिकी डॉलर आहे. भारत वर्षाला 1.2 बिलियन डॉलरची खेळणी आयात करतो. यातील बहुतांश खेळणी चीनमधून येतात. खेळण्याचं क्लस्टर घरगुती उत्पादन वाढवण्यासाठी आहे. चीन दरवर्षी 2000 कोटी डॉलर इतक्या रकमेची खेळणी आणि मनोरंजनाचं सामान दरवर्षी निर्यात करतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Karnataka, Pm narenda modi, Yediyurppa