उमेश श्रीवास्तव/मेरठ, 19 मे : कोरोनाव्हायरसवर (coronavirus) प्रभावी अशी लस आणि औषध उपलब्ध नाही. वेगवेगळे औषध वापरून या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. मात्र उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) एका रुग्णालयात कोरोना रुग्णांवर औषधांनी उपचार करण्याशिवाय त्यांना म्युझिक थेरेपीही (music therapy) दिली जात आहे. या रुग्णांना गाणी ऐकवली जात आहे आणि यामुळे रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचंही डॉक्टरांनी म्हटलं आहे. मेरठच्या (Meerut) एका रुग्णालयात कोविड-19 इन्स्ट्रुमेंटल म्युझिक (Instrumental music) सुरू असतं. डॉक्टरांनी सांगितलं, की यामुळे कोरोना रुग्ण खूप आनंदी आहेत. मेडिकल कॉलेज रुग्णालयातील रुग्णांची मानसिक आरोग्य ठेवण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. दिवसातून तीन वेळा कोविड वॉर्डमध्ये धीम्या आवाजात संगीत लावलं जातं. ज्यामुळे कोरोना रुग्णांमध्ये उत्साह येतो. हे वाचा - X-ray मार्फत होऊ शकतं कोरोनाव्हायरसचं निदान; खर्च आणि वेळही वाचणार कोविड वॉर्डचे प्रभारी डॉक्टर सुधीर राठी यांनी सांगितलं की, म्युझिक थेरेपी कोरोना रुग्णांना बरं करण्यात मोठी भूमिका निभावत आहे. कारण यामुळे रुग्णांचा आत्मविश्वास वाढतो. लखनऊतील डॉक्टर वेदप्रकाश यांच्या सल्ल्यानुसार कोविड वॉर्डमध्ये आणखी काही सकारात्मक पावलं उचलण्यात आलीत, ज्याचं रुग्णांनी स्वागत केलं आहे. डॉक्टर्सच्या मते, धीम्या आवाजात म्युझिक लावल्यानं रुग्णांचं फक्त मनोरंजनच होत नाही तर त्यांच्या प्रकृतीतवरही सकारात्मक परिणाम दिसून येतो आहे. हे वाचा - अरे देवा! कोरोनासह आता भारतात कावासाकीचं संकट; देशात आढळला पहिला रुग्ण कोरोनाव्हायरसचे रुग्ण मेरठमधील काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्ण नाचताना दिसून आले.याच रुग्णालयातील 85 वर्षीय कोरोनाग्रस्त महिला कोरोनावर मात करून घरी केली. इथल्या रुग्णांचा आत्मविश्वास वाढला आहे. कित्येक रुग्ण गाण्यावर डान्स करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मेरठमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 341 झाला आहे. तर 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 146 रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. संपादन - प्रिया लाड