अरे देवा! कोरोनासह आता भारतात कावासाकीचं संकट; देशात आढळला पहिला रुग्ण

अरे देवा! कोरोनासह आता भारतात कावासाकीचं संकट; देशात आढळला पहिला रुग्ण

कावासाकी (kawasaki) हा आजार लहान मुलांमध्ये दिसून येतो.

  • Share this:

चेन्नई, 19 मे : संपूर्ण देश कोरोनाव्हायरसशी दोनहात करत आहे, त्यात आता आणखी एका आजाराचं संकट आलं आहे. युरोपात पसरलेल्या या आजारानं आता भारतातही (India) पाय रोवलेत. देशात कावासाकी आजाराचा (kawasaki disease) पहिला रुग्ण आढळून आला आहे. सामान्यपणे लहान मुलांना होणारा हा आजार आहे. चेन्नईतील एका मुलामध्ये या आजाराची लक्षणं दिसून आलीत.

चेन्नईतील (chennai) 8 वर्षांच्या मुलामध्ये कावासाकी आजाराची लक्षणं दिसलं. हा मुलगा कोरोना संक्रमित आहे. त्याला चेन्नईतील कांची कामकोटी चाइल्ड ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. तिथं त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. तपासणीदरम्यान या मुलांमध्ये हायपर इन्फ्लेमेटरी सिंड्रोम आणि कावासाकी आजाराची लक्षणं दिसली.

हे वाचा - Lockdown नंतर लहान मुलांची होईल भयानक अवस्था; नोबेल विजेत्यांनी व्यक्त केली चिंता

डॉक्टरांच्या मते, मुलामध्ये सुरुवातीला अनेक आजारांची लक्षणं दिसली. तपासणीत त्याला सेप्टिक शॉकसह न्युमोनिया, कोविड 19, कावासाकी, टॉक्सिक शॉक सिंड्रोमची लक्षणं आढळली. कावासाकी आजारादरम्यान त्याला काही दिवस तीव्र ताप होता. पोटात वेदना होत होत्या, डायरिया होता, डोळे लाल झाले होते, तोंडावर लाल पुरळ होते आणि शरीरावर लाल चकत्या होत्या.

ब्रिटनमध्ये 100 पेक्षा जास्त रुग्ण

ब्रिटनमध्ये या आजाराचे अनेक रुग्ण आहेत. 100 पेक्षा अधिक मुलांना या आजाराची लागण झाली आहे. एप्रिल महिनाअखेर कावासाकी आजाराची प्रकरणं झपाट्यानं वाढताना दिसली. द सनच्या मते, 5 ते 16 वयोगटातील मुलं या आजाराचे शिकार झालेत. या आजारानं एका चिमुरड्याचा जीवही घेतला आहे. डेली मिररनं याबाबत वृत्त दिलं होतं. इतर युरोपियन देशांमध्येही अशी प्रकरणं आहेत.

हे वाचा - फक्त 2 तास राहिलं हे गोड हसू; कोरोनाशी संबंधित आजारानं घेतला चिमुरड्याचा जीव

द लँसेटच्या मते, कावासाकी आणि कोरोनाव्हायरसचा थेट संबंध आहे. उत्तर इटलीतील सर्वात जास्त कोरोना प्रभावित क्षेत्रात कावासाकी आजारात 30 पटीनं वाढ झाली आहे. एका अभ्यासानुसार 18 फेब्रुवारी ते 20 एप्रिलदरम्यान 10 मुलांमध्ये समान लक्।णं दिसून आलीत. या आजाराला डॉक्टरांनी पिडिएट्रिक इन्फ्लेमेटरी मल्टी सिस्टम सिंड्रोम असं नाव दिलं आहे. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाच्या महासाथीत या आजारानं डोकं वर काढणं म्हणजे या दोघांचाही काही ना काही संबंध जरूर आहे.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: May 19, 2020, 2:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading