मराठी बातम्या /बातम्या /देश /

सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रात जॅान्सन अ‍ॅण्ड जॅान्सन कंपनीचा परवाना रद्द

सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रात जॅान्सन अ‍ॅण्ड जॅान्सन कंपनीचा परवाना रद्द

लहान मुलांसाठी देशभरात वापरल्या जाणाऱ्या जॅान्सन अ‍ॅण्ड जॅान्सन कंपनीच्या पावडरवर राज्यात बंदी घालण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने कंपनीचा परवाना रद्द केला आहे.

लहान मुलांसाठी देशभरात वापरल्या जाणाऱ्या जॅान्सन अ‍ॅण्ड जॅान्सन कंपनीच्या पावडरवर राज्यात बंदी घालण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने कंपनीचा परवाना रद्द केला आहे.

लहान मुलांसाठी देशभरात वापरल्या जाणाऱ्या जॅान्सन अ‍ॅण्ड जॅान्सन कंपनीच्या पावडरवर राज्यात बंदी घालण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाने कंपनीचा परवाना रद्द केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

मुंबई, 16 सप्टेंबर : मुंबईतून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लहान मुलांसाठी देशभरात वापरल्या जाणाऱ्या जॅान्सन अ‍ॅण्ड जॅान्सन कंपनीच्या पावडरवर बंदी घालण्यात आली आहे. त्या पावडरमध्ये दोष आढळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या कंपनीचा थेट परवानाच रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने याबाबतचा निर्णय घेतला आहे.

जॅान्सन अ‍ॅण्ड जॅान्सन कंपनीच्या पावडरला देशभरात प्रचंड मागणी आहे. घराघरात प्रत्येक लहान मुलासाठी हे पावडर वापरलं जातं. गेल्या काही दिवसांपासून या पावडरमध्ये दोष असल्याच्या विविध चर्चा सुरु होत्या. अमेरिकेतही या पावडरवर बंदी आल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे या पावडरची चाचणी भारतात केली गेली. कोलकाताच्या प्रयोगशाळेत चाचणी केली गेली. त्याचा अहवाल समोर आला आहे. त्यामध्ये दोष आढळले आहेत. त्यामुळे राज्याच्या अन्न आणि ओषध प्रशासनाने कंपनीचा थेट परवाना रद्द केला आहे.

तान्ह्या मुलांसाठी वापरली जाणारी बेबी पावडर म्हणजे जॅान्सन अ‍ॅण्ड जॅान्सन. हे नाव बेबी प्रॉडक्ट्सशी गेली कित्येक वर्ष जोडलं गेलं आहे; पण आता मात्र 2023 पासून जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी जगभरातील टॅल्क बेस्ड बेबी पावडरची विक्री पूर्णपणे बंद करणार आहे. या कंपनीच्या वतीनेच ही माहिती देण्यात आली. अमेरिकेत सध्या सुरू असलेल्या हजारो कन्झ्युमर सेफ्टी केसेसमुळे या प्रॉडक्ट्सची विक्री बंद करणार असल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. गेली कित्येक वर्षे बेबी पावडर संपूर्ण जगभरात विकली जात आहे; पण आता मात्र जगभरातील पोर्टफोलिओ काढून टाकण्यात येणार आहे.

('...तर मी वरळीतून राजीनामा देतो', आदित्य ठाकरेंचं शिंदे गटाच्या आमदारांना सर्वात मोठं चॅलेंज)

2020 मध्ये कंपनीनं अमेरिका आणि कॅनडामध्ये पावडरची विक्री बंद केली होती. या पावडरमध्ये अ‍ॅस्बेटॉसचा एक धोकादायक फायबर आढळला होता. हा फायबर कॅन्सर होण्यास कारणीभूत असल्याचं मानलं जात होतं. या प्रकरणी 35 हजार महिलांनी गर्भाशयाचा कॅन्सर होण्याच्या आरोपावरून कंपनीवर खटला दाखल केला होतं. त्यामुळे अमेरिकेत जॉन्सनच्या प्रॉडक्ट्सची मागणी खूपच कमी झाली होती. विक्री कमी झाल्याच्या कारणावरून कंपनीनं 2020 मध्ये अमेरिका आणि कॅनडामध्ये बेबी पावडरची विक्रीच बंद केली होती; पण ब्रिटनसह जगातील अन्य देशांमध्ये मात्र जॉन्सनच्या बेबी पावडरची विक्री सुरूच होती. आता तीसुद्धा बंद होणार आहे.

या पावडरमुळे गर्भाशयाचा कॅन्सर होण्याच्या कारणावरून अमेरिकेतील एका कोर्टानं कंपनीला 15 हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. कंपनीनं लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ केला आहे, असा ठपका कोर्टानं ठेवला होता. कंपनी त्यांच्या प्रॉडक्ट्समध्ये अ‍ॅस्बेस्टॉस मिसळत असल्याचा आरोपही कंपनीवर करण्यात आला होता. कंपनीनं जो गुन्हा केला त्याची भरपाई पैशांमध्ये होऊच शकत नाही. पण हा अपराध अत्यंत मोठा आहे, त्यामुळे त्याचा दंड, शिक्षाही मोठ्याच प्रमाणात व्हायला हवी, असंही कोर्टानं थेट सुनावलं होतं.

1984 पासून जॉन्सन कंपनी बेबी पावडरची विक्री करते. फॅमिली फ्रेंडली असल्याचं दाखवल्यानं ही पावडर म्हणजे कंपनीचं सिंबॉल प्रॉडक्ट बनलं होतं. 1999 पासून कंपनीच्या इंटर्नल बेबी प्रॉडक्ट डिव्हिजनच्या वतीने याचं मार्केटिंग रिप्रेझेंटेशन केलं जात होतं. या सगळ्यांत मुख्य प्रॉडक्ट J & J #1 अ‍ॅसेटच्या रुपात बेबी पावडर असे. आता अमेरिकेत तर जॉन्सनच्या बेबी पावडरची विक्री पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. जगातील इतर देशांमध्येही आता ती बंद होईल.

First published:

Tags: Maharashtra News