मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'...तर मी वरळीतून राजीनामा देतो', आदित्य ठाकरेंचं शिंदे गटाच्या आमदारांना सर्वात मोठं चॅलेंज

'...तर मी वरळीतून राजीनामा देतो', आदित्य ठाकरेंचं शिंदे गटाच्या आमदारांना सर्वात मोठं चॅलेंज

आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांना एक मोठं जाहीर आव्हान दिलं आहे. त्यांच्या या आव्हानाला शिंदे गटाकडून नेमकं काय प्रत्युत्तर देण्यात येईल ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांना एक मोठं जाहीर आव्हान दिलं आहे. त्यांच्या या आव्हानाला शिंदे गटाकडून नेमकं काय प्रत्युत्तर देण्यात येईल ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांना एक मोठं जाहीर आव्हान दिलं आहे. त्यांच्या या आव्हानाला शिंदे गटाकडून नेमकं काय प्रत्युत्तर देण्यात येईल ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Chiplun, India

रत्नागिरी, 16 सप्टेंबर : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आज रत्नागिरीत पोहोचली आहे. रत्नागिरीच्या चिपळूण शहरात आज आदित्य ठाकरे यांची भर पावसात सभा झाली. या सभेत त्यांनी भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या आमदारांवर सडकून टीका केली. त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांना एक मोठं चॅलेंज दिलं आहे. सर्वच्या सर्व 40 आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं जावं. त्यांनी तसं केलं तर आपण स्वत: वरळीच्या आमदारकीचा राजीनामा देणार आणि पुन्हा निवडणुकीला सामोरं जाणार, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाच्या आमदारांना दिलं आहे. त्यांच्या या आव्हानाला शिंदे गटाकडून काय उत्तर दिलं जातं ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

"गद्दारीचा शिक्का पुसायचा असेल तर आमदारकीचा राजीनामा देऊन निवडणुकीला समोरे जा. तुम्ही सगळ्यांनी राजीनामा द्या. मी वरळीमधून राजीनामा देतो", अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटाच्या आमदारांना चॅलेंज दिलं. आदित्य यांनी यावेळी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरुन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावरही निशाणा साधला. "मुंबई-गोवा महामार्गावर हाडांचे, मानेचे उपचार करणारे उद्योग आणा. मुख्यमंत्री स्वतःसाठी 11 वेळा दिल्लीत गेले. आता एकदा तरी महाराष्ट्रासाठी दिल्लीत जा आणि उद्योग वाचवा. संजय राठोड मंत्री झाले. पण उद्याप पदभार स्वीकारला नाही. त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. राज्यातले उद्योग राज्याबाहेर जातात. हे मंत्रिमडंळाच्या लक्षात नाही", अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

(आदित्य ठाकरेंसाठी पाऊस मोठी संधी घेवून येणार? सिंधुदुर्गात स्वागतासाठी शिवसैनिकांची प्रचंड गर्दी, पाहा VIDEO)

"हापनिक म्हणजे तानाजी सावंत यांना माणूस वाटतो. तिवरे धरण फुटलं तेव्हा खेकडे दिसत होते. आणखी खोल गेले असते तर काय दिसलं असतं त्यांनाच ठाऊक", अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी तानाजी सावंत यांच्यावरही निशाणा साधला.

चिपळूणमध्ये आदित्य ठाकरेंच्या सभेला तुफान गर्दी

आदित्य ठाकरे हे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची शिवसंवाद यात्रा ही आज रत्नागिरीत येवून पोहोचली आहे. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये शिवसंवाद यात्रेतील आदित्य ठाकरेंची भव्य सभा आयोजित करण्यात आलीय. या सभेला आदित्य ठाकरे यांच्या समर्थनार्थ आलेल्या शिवसैनिकांची प्रचंड गर्दी बघायला मिळतेय. एकीकडे मुसळधार पाऊस पडतोय. दुसरीकडे आदित्य ठाकरेंची सभा, पण शिवसैनिकांमधील उत्साह अजिबात कमी झालेला नाही. शेकडो शिवसैनिक हातात छत्री घेवून शिवसंवाद यात्रेसाठी दाखल झाले आहेत. ही गर्दी आणि पाऊस आदित्य ठाकरेंकडे खरंच काही संधी घेवून येतेय का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण सध्याचं पावसाचं वातावरण तरी आदित्य ठाकरे यांच्यासाठी चिपळूणमध्ये पोषक आहे, असं दिसतंय. कारण भर पावसात शेकडो शिवसैनिकांनी त्यांच्या सभेला गर्दी केली आहे. यामध्ये महिलांचा प्रचंड समावेश आहे.

First published:

Tags: Aaditya Thackeray, Eknath Shinde, Shiv sena