नवी दिल्ली 23 ऑगस्ट : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजेच JNU सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतं. आता JNU च्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी यांच्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. हिंदू देव-देवतांबद्दल बोलताना शांतीश्री धुलीपुडी म्हणाल्या, की हिंदू देव-देवता उच्च जातीचे नाहीत. भगवान शंकरदेखील अनुसूचित जाती-जमाती म्हणजेच शूद्र असू शकतात. मानवजातीच्या विज्ञानानुसार देव उच्च जातीचे नाहीत, असं मत त्यांनी मांडलं “मनुस्मृतीत महिलांना शूद्रांचा दर्जा देण्यात आला आहे. महिलांना त्यांच्या वडिलांकडून किंवा पतीकडून जात मिळते. हे प्रतिगामी असण्याचं लक्षण आहे”, असंही त्या म्हणाल्या आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेत आंबेडकरांचे लैंगिक न्यायाबद्दलचे विचार: समान नागरी संहिता डीकोडिंग या विषयावर व्याख्यान देताना शांतीश्री धुलीपुडी यांनी हे विधान केलं. Exclusive: भारतातील ही व्यक्ती होती निशाण्यावर; रशियात पकडलेल्या IS सुसाईड बॉम्बरचा खुलासा अनेकांना मानवजातीच्या विज्ञानानुसार आपल्या देवांची उत्पत्ती माहित असावी. कोणताही देव ब्राह्मण नसतो, सर्वोच्च क्षत्रिय असतो. भगवान शंकर स्मशानभूमीत बसल्यामुळे अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीचे असावेत. शंकराच्या गळ्यात साप असतो. अंगावर कपडेही कमी कपडे असतात, असंही कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी म्हणाल्या. कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी यांच्या म्हणण्यानुसार, मानवजातीच्या शास्त्रानुसार माता लक्ष्मी, शक्ती अगदी भगवान जगन्नाथही उच्च जातीतून आलेले नाहीत. भगवान जगन्नाथ हे खरे तर आदिवासी वंशाचे आहेत. मग आजही आपण हा भेदभाव का सुरू ठेवतोय जो अत्यंत अमानवी आहे. बाबासाहेबांच्या विचारांचा आपण पुनर्विचार करत आहोत हे फार महत्वाचे आहेत. हिंदू धर्म हा धर्म नाही, ती जीवनपद्धती आहे. अजितदादा धनंजय मुंडेंच्या पाठीशी, मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर व्यक्त केली नाराजी, म्हणाले…. कोण आहेत शांतीश्री धुलीपुडी शांतीश्री धुलीपुडी सध्या जेएनयूच्या कुलगुरु म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातप्राध्यापिका होत्या. त्या जेएनयूच्या माजी विद्यार्थिनीदेखील आहेत. त्या जेअनयूच्या पहिल्या महिला कुलगुरू आहेत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.