मराठी बातम्या /बातम्या /देश /

Exclusive: भारतातील ही व्यक्ती होती निशाण्यावर; रशियात पकडलेल्या IS सुसाईड बॉम्बरचा खुलासा

Exclusive: भारतातील ही व्यक्ती होती निशाण्यावर; रशियात पकडलेल्या IS सुसाईड बॉम्बरचा खुलासा

1992 मध्ये जन्मलेल्या अझामोव्हची आयएसने तुर्कीमध्ये भरती केली होती, जिथे त्याने प्रशिक्षण घेतले होते (ISIS Suicide Bomber) . शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केला आहे, असं अझामोव्हचं मत होतं

1992 मध्ये जन्मलेल्या अझामोव्हची आयएसने तुर्कीमध्ये भरती केली होती, जिथे त्याने प्रशिक्षण घेतले होते (ISIS Suicide Bomber) . शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केला आहे, असं अझामोव्हचं मत होतं

1992 मध्ये जन्मलेल्या अझामोव्हची आयएसने तुर्कीमध्ये भरती केली होती, जिथे त्याने प्रशिक्षण घेतले होते (ISIS Suicide Bomber) . शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केला आहे, असं अझामोव्हचं मत होतं

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 23 ऑगस्ट : इस्लामिक स्टेटमधील (IS) आत्मघाती बॉम्बर, ज्याला इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) म्हणूनही ओळखले जातं, तो सध्या रशियामध्ये अटकेत आहे. त्याला भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याचं एकमेव काम देण्यात आलं होतं, असं गुप्तचर सूत्रांनी सीएनएन-न्यूज 18 ला सांगितलं.

1992 मध्ये जन्मलेल्या अझामोव्हची आयएसने तुर्कीमध्ये भरती केली होती, जिथे त्याने प्रशिक्षण घेतले होते. शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांचा अपमान केला आहे, असं अझामोव्हचं मत होतं आणि त्यामुळेच नुपूर शर्मा यांना मारण्याचा तो प्रयत्न करत होता, असं सूत्रांनी सांगितलं. रशियातून भारतात येताना त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून ही धक्कादायक माहिती मिळाली. हा व्यक्ती संशयास्पदरित्या रशियामार्गे भारतात घुसणार होता. त्याचवेळी त्याला भारतात येताना अटक करण्यात आली.

भारतात आत्मघातकी हल्लाचा मोठा कट, रशियात पकडला IS चा सुसाईड बॉम्बर

योजनेचा एक भाग म्हणून त्याला भारतीय व्हिसा मिळवण्यासाठी रशियाला पाठवण्यात आलं. नवी दिल्लीत आल्यावर त्याला स्थानिक मदतीचं आश्वासन देण्यात आलं होतं, असं सूत्रांनी सांगितलं. त्याच्या चौकशीदरम्यान, अझामोव्ह म्हणाला की तो ऑनलाइन कट्टरपंथी झाला होता आणि तो त्याच्या कोणत्याही नेत्याला भेटला नव्हता. सूत्रांनी सांगितलं की, ऑपरेशनच्या दुसऱ्या टप्प्याचा एक भाग म्हणून त्याला रशियाला पाठवण्यात आलं होतं.

27 जुलै रोजी एका परदेशी दहशतवादविरोधी एजन्सीने भारताला रशियामध्ये अटक केलेल्या बॉम्बरची माहिती दिली. सूत्रांनी सांगितलं की, किर्गिस्तान आणि उझबेकिस्तानमधील दोन आत्मघाती हल्लेखोर भारतात दहशतवादी हल्ल्यासाठी तयार होते. त्यापैकी एक तुर्कीमध्ये होता.

Pulwama : सुरक्षा दलाने मोठ्या घातपाताचा कट उधळला, 10 किलो स्फोटकं जप्त

भारताला सांगण्यात आलं की ते रशियामार्गे येतील आणि त्यांचा व्हिसा अर्ज ऑगस्टमध्ये मॉस्कोमधील रशियन दूतावास किंवा अन्य वाणिज्य दूतावासात जाईल, असे सूत्रांनी सांगितले. हे तपशील रशियाला देखील सामायिक केले गेले, ज्यामुळे त्याला रशियन फेडरल सिक्युरिटी सर्व्हिसने (एफएसबी) ताब्यात घेतले, असे सूत्रांनी सांगितले.

भारतीय एजन्सींना दहशतवादी कट रचत असल्याची माहिती मिळताच, दहशतवादविरोधी पथकाने (ATS) IS नेटवर्कचा कणा मोडण्यासाठी देशभर बैठका घेतल्या. त्यानंतर एजन्सीने आयएसवर सतत कारवाई सुरू केली. दोन दिवसांत किमान 35 ठिकाणी छापे टाकून लोकांना ताब्यात घेण्यात आले.

“तुर्कस्तानमध्ये असताना एप्रिल ते जून 2022 या कालावधीत एका परदेशी व्यक्तीला ITO ‘IS’ च्या एका नेत्याने आत्मघाती बॉम्बर म्हणून भरती केल्याचं सिद्ध झालं आहे. मेसेंजर टेलीग्रामच्या खात्यांद्वारे आणि दहशतवादी संघटनेच्या प्रतिनिधीने इस्तंबूलमधील वैयक्तिक बैठकी दरम्यान त्याला या कामासाठी तयार केलं गेलं," अशी माहिती रशियन सुरक्षा एजन्सीच्या निवेदनात दिली गेली आहे.

First published:

Tags: Attack, Terrorist