मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Shocking ! अल्पवयीन मुलीला विवस्त्र करुन मारहाण, नग्न व्हिडीओ केला शूट, मुंबईतील धक्कादायक घटना

Shocking ! अल्पवयीन मुलीला विवस्त्र करुन मारहाण, नग्न व्हिडीओ केला शूट, मुंबईतील धक्कादायक घटना

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Mumbai News: मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीचे कपडे उतरवून तिला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 10 डिसेंबर : मुंबईत (mumbai) घरकाम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला विवस्त्र करुन बेदम मारहाण (minor girl stripped naked and beaten) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना मुंबईथील अंधेरी परिसरात घडली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी 17 वर्षांची असून ती आरोपी महिलेच्या घरी घरकाम करते. (Shocking news, Mumbai minor girl stripped naked and beaten)

विवस्त्र करुन मारहाण, नग्न व्हिडीओही केला शूट

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 6 डिसेंबर रोजी ही घटना घडली आहे. पीडित मुलगी ही अंधेरीतील वर्सोवा परिसरात एका महिलेकडे घरकाम करते. 6 डिसेंबर रोजी या मुलीला कामावर जाण्यासाटी थोडा उशीर झाला. याचाच राग आल्याने घर मालकिन असलेल्या महिलेने या मुलीला कपडे उतरवण्यास सांगितले त्यानंतर तिला बेदम मारहाण केली. आरोपी महिला यावरच थांबलेली नाही तर या मुलीला नग्न करुन तिचा व्हिडीओ सुद्धा शूट केला.

वाचा : Shocking VIDEO : आधी बाईकवरुन ढकललं, अन् अगदी जवळ येऊन झाडल्या गोळ्या

पीडित मुलीला करण्यात आलेल्या मारहाणीत ती जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या घटनेप्रकरणी पीडित मुलीच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पीडित मुलीच्या भावाने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी महिलेच्या विरुद्ध संबंधित कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

घरकामात काही चूक झाल्यास किंवा हवं तसं काम न झाल्यास घरमालकांकडून मोलकरणींसोबत मारहाण, शिवीगाळ होण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत.

वाचा : टेपरेकॉर्डरच्या आवाजावरुन दोघांमध्ये वाद, रागाच्या भरात तरुणानं केला शेजारच्याचा गेम खल्लास; हत्येनं हादरलं मालाड

चंद्रपुरात मुलाने केला वडिलांच्या प्रेयसीचा खून

वडिलांच्या अफेअरला वैतालेल्या मुलाने त्यांच्या प्रेयसीचा खून केल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरमध्ये घडली आहे. आपल्या वडिलांचं दुसऱ्या महिलोसोबत असणारं प्रेमप्रकरण, त्यावरून आई आणि वडिलांची होणारी सततची भांडणं आणि त्यामुळे समाजात होणार बदनामी यांना वैतागलेल्या तरुणाने हा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी वडिलांच्या प्रेयसीचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. वडिलांच्या प्रेयसीचा खून केल्यावर सर्व प्रश्न संपतील, असं त्याला वाटलं आणि त्याने एका साथीदाराच्या मदतीने महिलेच्या खुनाचा कट आखला.

चंद्रपुरच्या रामनगर परिसरात राहणाऱ्या 55 वर्षांच्या व्यक्तीचं 35 वर्षांच्या महिलेसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. त्याच्या 20 वर्षांच्या मुलाला हे प्रकरण अमान्य होतं. त्यासाठी या तरुणाने त्याच्या चुलतभावाच्या मदतीने महिलेच्या हत्येचा कट रचला. घटनेच्या दिवशी महिलेला गाठून दोघांनी धारदार चाकूने महिलेच्या गळ्यावर आणि पाठीवर वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा खून झाला. त्यानंतर पळून गेलेल्या मुलाला आणि त्याच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे.

First published:

Tags: Crime, Mumbai