Home /News /crime /

नराधम! मेडिकल दुकानदाराचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नशेचं इंजेक्शन देऊन दुष्कृत्य

नराधम! मेडिकल दुकानदाराचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, नशेचं इंजेक्शन देऊन दुष्कृत्य

शेजारी असणाऱ्या ओळखीच्या मेडिकल दुकानदाराने अल्पवयीन मुलीला नशेचं इंजेक्शन दिलं आणि तिला नरकयातना दिल्या.

    बरेली, 9 डिसेंबर: अल्पवयीन मुलीला (Minor girl) नशेचं इंजेक्शन (Injection) देऊन एका मेडिकल दुकानदाराने (Medical shop owner) तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. खाऊ देण्याच्या बहाण्याने त्याने मुलीला बोलावून घेतलं आणि तिच्यावर अमानूष अत्याचार केले. शेजारी राहणाऱ्या मेडिकल दुकानदाराकडे विश्वासाने पाठवलेल्या मुलीसोबत त्यानं केलेलं हे कृत्य पाहून मुलीच्या आईवडिलांना जबर धक्का बसला आहे. अशी घडली घटना उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील शाळेत शिकणारी अल्पवयीन मुलगी नुकतीच ट्यूशन क्लासवरून परत आली होती. तिच्या आईसोबत ती घरी चालली असताना समोरच असलेल्या मेडिकल शॉपच्या मालकानं तिला हाक मारली. काहीतरी काम असेल आणि सहज गप्पा मारण्यासाठी मुलीला बोलावलं असेल, असं समजून तिच्या आईने तिला तिथेच सोडलं आणि घरी गेली. दुकानदाराने मुलीला मेडिकल शॉपमध्ये बोलावलं आणि तिथं बसायला सांगितलं. मुलीला दिलं इंजेक्शन काही वेळ गप्पा मारल्यानंतर मुलीचं लक्ष नसल्याचं पाहून त्यानं अचानक एक नशेचं इंजेक्शन तिला टोचलं. त्यामुळे काही समजायच्या आत मुलगी बेशुद्ध झाली. त्यानंतर दुकानाचं शटर खाली करून त्याने मुलीवर अत्याचार करायला सुरुवात केली. हा प्रकार लांबून पाहणाऱ्या इतर व्यापाऱ्यांना काहीतरी विपरीत घडत असल्याचा संशय आला आणि त्यांनी शटर उघडण्याचा प्रयत्न केला. त्यातील काहींनी मुलीच्या घरी याची कल्पना दिली आणि काही वेळातच दुकानाच्या बाहेर मोठी गर्दी जमली आणि शटर उघडण्याचा प्रयत्न सर्वजण करू लागले. दुकानदाराच्या नातेवाईकांकडून मारहाण यावेळी दुकानदाराची आई आणि त्याचा भाऊ यांनी बाहेर जमलेल्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. दुकानदाराने शटर आतून बंद केल्यामुळे ते उघडलं जात नव्हतं. बाहेर गर्दी जमल्यावर आणि आरडाओरडा सुरू झाल्यानंतरदेखील दुकानदारानं आपलं कृत्य सुरूच ठेवलं होतं. हे वाचा - 9 वर्षांच्या मुलीला भावोजीनं दिल्या नरकयातना, 4 महिन्यानंतर 'अशी' समजली आपबिती पोलिसांना पाचारण या घटनेची कल्पना पोलिसांना दिल्यावर पोलीस घटनास्थळी हजर झाले. त्यांनी शटर तोडून आत प्रवेश केला. आतमध्ये अर्धनग्न अवस्थेतील बेशुद्ध पडलेली मुलगी त्यांना सापडली. पोलिसांनी दुकानदाराला अटक केली असून त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे मुलीच्या कुटुंबीयांसह सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलीस या प्रकऱणी अधिक तपास करत आहेत.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Rape, Uttar pardesh

    पुढील बातम्या