मराठी बातम्या /बातम्या /देश /15 व्या मजल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्या, इमारतीत शिरतानाचा फोटो CCTV कॅमेऱ्यात कैद

15 व्या मजल्यावरुन उडी मारुन तरुणीची आत्महत्या, इमारतीत शिरतानाचा फोटो CCTV कॅमेऱ्यात कैद

एका तरुणीनं आत्महत्या केली आहे.  तरुणीचा 15 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे.

एका तरुणीनं आत्महत्या केली आहे. तरुणीचा 15 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे.

एका तरुणीनं आत्महत्या केली आहे. तरुणीचा 15 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे.

झारखंड, 01 ऑक्टोबर: झारखंडची (Jharkhand) राजधानी लालपूर (Lalpur) क्षेत्रात एका तरुणीनं आत्महत्या केली आहे. तरुणीचा 15 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. सध्या या इमारतीचे बांधकाम (under construction) सुरू आहे. या इमारतीत प्रवेश करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Camera) तरुणी कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच लालपूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी रिम्स रुग्णालयात पाठवला. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना लालपूर पोलीस स्टेशन परिसरातील भाजी मार्केट परिसरातील आहे. इमारतीचं काम करणाऱ्या मजुरांनी स्थानिक लोकांना सांगितलं की, तरुणीनं इमारतीच्या 15 व्या मजल्यावरून उडी मारली. ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. लोकांनी या घटनेची माहिती लालपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांना दिली. माहिती मिळताच लालपूर पोलीस ठाण्याचे पोलीस पथक फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

हेही वाचा- पतीच्या निधनानंतर आठ दिवसांतच हरली हिंमत, विवाहितेनं चिमुकलीसह केला हृदयद्रावक शेवट 

लालपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी राजीव कुमार यांनी या संदर्भात सांगितलं की, मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे आणि पोस्टमार्टमसाठी रिम्स रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

लालपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणाले की, प्रत्येक टप्प्यावर तपास केला जात असून या प्रकरणी इमारतीचं काम करणाऱ्या कामगारांची देखील चौकशी केली जाईल.

तरुणी CCTV कॅमेऱ्यात कैद

मृत तरुणीचं नाव विनीता असं आहे. विनिताने रांचीतील व्हीआयपी अपार्टमेंटपैकी एसजी एक्सोटिकाच्या 15 व्या मजल्यावरून उडी मारली होती. ती जमिनीवर पडताच तिचा मृत्यू झाला. इमारतीतमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात विनीताच्या पाठीवर एक बॅग दिसत असून ती इमारतीत प्रवेश करताना दिसत आहे. ज्यावेळी ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होते त्यानंतर 20 मिनिटांनंतर इमारतीच्या वरच्या मजल्यावर जाऊन उडी मारते.

हेही वाचा- IND W vs AUS W : स्मृती मंधानाचं दमदार शतक, ऐतिहासिक कामगिरी करणारी पहिली भारतीय 

प्रकरणाची माहिती मिळताच लालपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावळी FSLच्या टीमला पाचारण करण्यात आले. एफएसएल टीमला विनितासोबत सापडलेल्या बॅगमधून कॉलेजचे आयडी कार्ड सापडले. त्यानंतर तिची ओळख पटली आहे.

First published:
top videos

    Tags: Cctv footage, Jharkhand