मुंबई, 21 नोव्हेंबर: पुढच्या वर्षी होणारी आयपीएल स्पर्धा (IPL 2022) ही खास असणार आहे. या स्पर्धेत आता दोन नव्या टीम सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर या सिझनपूर्वी मेगा ऑक्शन (IPL 2022 Mega Auction) होणार आहे. या ऑक्शननंतर सर्व टीमची नव्यानं रचना होणार आहे. दोन टीम जास्त असल्यानं अनेक नवे खेळाडू देखील पुढील आयपीएलमध्ये खेळतील. क्रिकेट विश्वातील सर्वात प्रतिष्ठेची टी20 लीग असलेल्या या स्पर्धेबाबत एक महत्त्वाची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) केली आहे. या घोषणेमुळे भारतीय फॅन्सला मोठा दिलासा मिळाला आहे. आयपीएलचा पुढील सिझन भारतामध्येच होणार असल्याची घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) यांनी केली आहे. चेन्नईतील ‘चॅम्पिंयन्स कॉल’ या कार्यक्रमात शहा सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी पुढील सिझन भारतामध्येच होणार असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब केलं. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) टीमनं चौथ्यांदा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावल्याबद्दल या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. चेन्नईचा (CSK) कॅप्टन महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) देखील या कार्यक्रमात सहभागी झाला होता. ‘मला माहिती आहे की, तुम्ही सर्वजण सीएसकेला चेपॉकच्या मैदानात खेळताना पाहण्याची आतुरतेनं वाट पाहात आहात. आता हा क्षण फार दूर नाही. आयपीएल स्पर्धेचा 15 वा सिझन भारतामध्येच खेळवला जाणार आहे. दोन नव्या टीमच्या सहभागामुळे आगामी सिझन अधिक चुरशीचा होईल.’ असे शहा यांनी स्पष्ट केले. आयपीएलच्या मागील सिझनचा (IPL 2021) सुरुवातीचा भाग भारतामध्ये झाला. कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे त्यानंतर उत्तरार्ध यूएईमध्ये शिफ्ट करावा लागला. या स्पर्धेची फायनल देखील यूएईमध्येच झाली. आयपीएल स्पर्धेचा मेगा ऑक्शन डिसेंबरमध्ये होणार आहे. तो आणखी खास होईल, अशी अपेक्षा शहा यांनी यावेळी व्यक्त केली. लज्जास्पद! आफ्रिदीचा तोल ढासळला, SIX लगावणाऱ्या खेळाडूच्या अंगावर फेकला बॉल! VIDEO सीव्हीसी कॅपिटलनं अहमदाबादसाठी 5,625 कोटींची बोली जिंकली आहे. तर आरपी-संजीव गोयंका समुहानं 7,090 कोटी रूपयांना लखनऊची फ्रँचायझी खरेदी केली आहे. या दोन्ही शहरांच्या टीम पुढील आयपीएलमध्ये खेळणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.