रांची, 26 नोव्हेंबर: झारखंडच्या (Jharkhand) रिम्समधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. जिथे एक निर्दयी आई आपल्या तान्ह्या बाळाला जन्म देऊन पळून गेली आहे. दोन डोकं असलेलं बाळ जन्माला आल्यानं ही जन्मदाती आईनं रुग्णालयातून पळ काढला आहे. असे सांगितले जात आहे की, मुलाला जन्मापासूनच ऑसिपिटल मेनिंजो इंसेफेलॉसिल (Occipital Meningo Encephalocele) या आजाराने ग्रासलं आहे. या आजारात डोक्याचा मागचा भाग बाहेर येऊन थैलीसारखा होऊन तो दोन डोक्यांसारखा दिसतो. तसंच हा भाग मेंदू आणि त्वचेलाही जोडलेला असतो.
बाळाला ऑसिपिटल मेनिंजो इंसेफेलॉसिल नावाच्या आजारानं ग्रासलं
अशा बाळाला पाहून घरातील कुटुंबीयांनी त्याला गुपचूप रिम्समध्ये सोडून पळ काढला. याप्रकरणी रुग्णालय व्यवस्थापनाने पोलिसांशी संपर्क साधला. तपासात पत्ता बनावट असल्याचं निष्पन्न झालं. यानंतर डॉक्टरांच्या टीमने त्याला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी चालवलेली एनजीओ त्या बाळाची काळजी घेत आहे.
हेही वाचा- धोक्याची घंटा, द.आफ्रिकेतल्या नव्या Variantनंतर भारत सरकार Alert; निर्देश जारी
बाळाला 10 दिवसांनी रुग्णालयातून सोडण्यात येईल
RIMS मधील न्यूरो सर्जरी विभागाचे डॉ. सहाय म्हणाले, "डॉक्टरांच्या टीमनं दोन तासांच्या ऑपरेशननंतर बाळाच्या डोक्यातील अतिरिक्त भाग काढून टाकला आहे. पुढील 3 दिवस, नवजात बाळ डॉक्टरांच्या जवळच्या देखरेखीखाली असणार आहे. बाळावर मोठी शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याला वाचवण्यात यश आलं आहे. बाळाची जबाबदारी घेणारी स्वयंसेवी संस्था चमच्यानं त्याला आहारही देत आहेत. त्याला 10 दिवसांनी डिस्चार्ज मिळणार आहे.
हेही वाचा- योगी आदित्यनाथांच्या खांद्यावर हात ठेवून काय बोलते होते PM मोदी?, झाला खुलासा
मेनिंजो इंसेफेलॉसिल म्हणजे काय?
मेनिंजो इंसेफेलॉसिल हा एक जन्मजात रोग आहे. ज्यामध्ये कवटीचा काही भाग हाडातून बाहेर काढला जातो. ते डोक्याच्या बाहेरील बाजूस थैलीच्या स्वरूपात साठवले जातात. टाळूच्या भागाबरोबरच त्वचेलाही जोडलेले असते. या बाळाला आयुष्यभर याचा सामना करण्याची शक्यता आहे. यासोबतच इतर आजार होण्याची शक्यता असते. जसं की पाठीचा कणा बाहेर येण्याची शक्यता असते. याला मेनिंजो इंसेफेलॉसिल म्हणतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Jharkhand