उत्तर प्रदेश, 26 नोव्हेंबर: गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तीन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यानचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (UP CM Yogi Adityanath)यांचा फोटो (Photo) व्हायरल झाला. या फोटोची बरीच चर्चा झाली. या फोटोमध्ये पंतप्रधान यूपीच्या मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर हात ठेवून चालताना आणि त्यांच्याशी गंभीर संवाद साधताना दिसत होते. दोन्ही नेत्यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अखेर पंतप्रधान मोदी सीएम योगी यांच्याशी काय बोलत असतील असा प्रश्न निर्माण झाला. याचा खुलासा आता संरक्षण मंत्री आणि लखनऊचे भाजप खासदार राजनाथ सिंह यांनी केला आहे.
सिंह यांनी गुरुवारी संध्याकाळी एका ट्विटमध्ये म्हटले की, "अलीकडेच एका ट्विटमध्ये एक फोटो दिसला ज्यामध्ये पीएम नरेंद्र मोदी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या खांद्यावर हात ठेवून काहीतरी बोलत आहेत. पंतप्रधान यूपीच्या मुख्यमंत्र्यांना नेमकं काय बोलत होते असा प्रश्न सर्वांना पडला. त्यावेळी पंतप्रधान म्हणत होते की, योगीजी तुम्ही एका दमदार खेळाडूसारखी बॅटिंग करत आहात आणि तुम्ही तुमचा उत्कृष्ट फॉर्म चालू ठेवला पाहिजे ज्यामुळे शेवटी भाजपला विजय मिळण्यास मदत होईल.
अभी एक फोटो ट्वीट किया गया जिसमें मोदी जी ने योगी जी के कंधे पर हाथ रखा हुआ हुआ था। यह फोटों देखकर सभी लोग सोच रहे थे कि मोदीजी उनसे क्या कह रहे थे.. pic.twitter.com/HBD5NESCxZ
— Rajnath Singh (@rajnathsingh) November 25, 2021
योगी आदित्यनाथ यांनी शेअर केला होता फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 56 व्या DGP IGP परिषदेला उपस्थित राहण्यासाठी तीन दिवसांच्या लखनऊ दौऱ्यावर होती. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान दोघांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. त्याच दरम्यान सीएम योगी यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा त्यांचा फोटो शेअर केला. ज्यामध्ये पीएम मोदी त्यांच्या खांद्यावर हात ठेवून चालताना दिसले होते.
या फोटोमध्ये पंतप्रधान राजभवनाच्या कॉरिडॉरमध्ये मुख्यमंत्री योगींच्या खांद्यावर हात ठेवून फिरताना आणि सखोल चर्चा करताना दिसत आहेत.
हम निकल पड़े हैं प्रण करके अपना तन-मन अर्पण करके जिद है एक सूर्य उगाना है अम्बर से ऊँचा जाना है एक भारत नया बनाना है pic.twitter.com/0uH4JDdPJE
— Yogi Adityanath (@myogiadityanath) November 21, 2021
योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदींसोबतचा फोटो शेअर करत एका कवितेतून आपलं मत व्यक्त केलं. त्यांनी लिहिलं, ‘हम निकल पड़े हैं प्रण करके, अपना तन-मन अर्पण करके, जिद है एक सूर्य उगाना है, अम्बर से ऊंचा जाना है, एक भारत नया बनाना है.’
पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका
पुढील वर्षी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वारंवार भेटी होत आहेत. या अंतर्गत, यापूर्वी पंतप्रधान मोदींनी राणी लक्ष्मीबाईच्या जयंतीनिमित्त झाशीमध्ये विविध प्रकल्पांची सुरुवात केली होती. त्याचबरोबर याआधी गृहमंत्री अमित शहा यांनीही राज्यातील अनेक शहरांमध्ये मोठ्या सभांना संबोधित केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.