मराठी बातम्या /बातम्या /देश /

रात्री एकत्र झोपले होते काका-पुतण्या, सकाळी खोलीत आढळले मृताव्यस्थेत

रात्री एकत्र झोपले होते काका-पुतण्या, सकाळी खोलीत आढळले मृताव्यस्थेत

बंद खोलीतून दोन मृतदेह (Two bodies) सापडले आहेत. मृत हे दोघंही काका-पुतणे (uncle and nephew) आहेत.

बंद खोलीतून दोन मृतदेह (Two bodies) सापडले आहेत. मृत हे दोघंही काका-पुतणे (uncle and nephew) आहेत.

बंद खोलीतून दोन मृतदेह (Two bodies) सापडले आहेत. मृत हे दोघंही काका-पुतणे (uncle and nephew) आहेत.

  • Published by:  Pooja Vichare

झारखंड, 23 डिसेंबर: यावेळची सर्वात मोठी (Biggest News) बातमी झारखंडची राजधानी रांचीमधून (Ranchi) येत आहे. येथे बंद खोलीतून दोन मृतदेह (Two bodies) सापडले आहेत. मृत हे दोघंही काका-पुतणे (uncle and nephew) आहेत. रात्री काका-पुतणे एकत्र झोपले होते आणि सकाळी बंद खोलीतून त्यांचा मृतदेह सापडल्याचं सांगण्यात येत आहे. हे प्रकरण रांचीच्या सुखदेव नगर पोलीस स्टेशन परिसरातील मधुकामचे आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी दोघांचंही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.

सकाळी उशिरापर्यंत घराचा दरवाजा न उघडल्याने लोकांना संशय आला. लोकांनी दरवाजा तोडून पाहिले असता खोलीत काका-पुतण्याचा मृतदेह पडलेला आढळून आला. या घटनेची नोंद सुखदेव नगर पोलीस ठाण्यात करण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा तपास करत आहेत. सुखदेव नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणाले की, सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून कुटुंबीयांची चौकशी केली जात आहे.

हेही वाचा- पुन्हा एकदा Blast..!कोर्टाच्या तिसऱ्या मजल्यावर स्फोट, 2 जणांचा मृत्यू; 4 जखमी

राजधानीच्या सुखदेव नगर पोलीस स्टेशन परिसरात दोन मृतदेह सापडले आहेत. मृत दोघांमध्ये काका-पुतण्याच्या नातं होतं. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. गुदमरल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत.

बंद खोलीत सापडले दोन मृतदेह

राजधानीच्या सुखदेव नगरमधील बंद खोलीतून दोन मृतदेह सापडले आहेत. मयत दोघेही नात्यात काका-पुतण्या असल्याचं समजतं. सुखदेव नगर पोलीस ठाण्याच्या प्रभारी ममता यांनी सांगितले की, ज्या खोलीतून दोन्ही मृतदेह सापडले ती खोली आतून बंद होती. अशा स्थितीत थंडीपासून वाचण्यासाठी दोघांनी घरात आग लावली असावी, असे मानले जाते. खोलीचे सर्व दरवाजे आणि खिडक्या बंद असल्याने दोघांचाही गुदमरून मृत्यू झाला असण्याची शक्यता आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात गुंतले असले तरी दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रिम्स रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.पोस्टमॉर्टमनंतर मृत्यूचे कारणही समोर येईल.

हेही वाचा- एक तक्रार RTI कार्यकर्त्यांच्या जीवाशी, पायात ठोकले खिळे;  हातही मोडले

काही दिवसांपूर्वी बिहारमधील एका व्यक्तीचा मृतदेह रांचीमध्ये सापडला होता. मिळालेल्या माहितीनुसार, सुधांशू शेखर असे त्या व्यक्तीचे नाव आहे. तो बिहारमधील शेखपुरा जिल्ह्यातील रहिवासी होता. एका नातेवाईकाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी तो 29 नोव्हेंबरला रांचीला पोहोचला होता. यानंतर सुधांशू बेपत्ता झाला. यानंतर सुधांशूचा मृतदेह स्टेडियममध्ये पुरण्यात आला.

प्रेमप्रकरणात दुहेरी हत्या

राजधानी रांचीच्या तुपुदाना ओपी परिसरातील शांती नगरमध्ये प्रेमप्रकरणातून एका तरुण आणि तरुणीची पाय कापून हत्या करण्यात आली. नोव्हेंबरमध्ये घडलेल्या या घटनेत दोन्ही मृतांच्या चेहऱ्यावर आणि शरीराच्या अनेक भागांवर जखमांच्या खुणा आढळल्या होत्या. शांतीनगर येथील जमिनीतून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. पूजा कच्छप आणि विवेक तिग्गा अशी या दोघांची नावे आहेत. पूजा कुंबा टोळी येथील तर विवेक शांतीनगर येथील रहिवासी होता.

बोकारो येथे बंद खोलीत सापडले 3 मृतदेह

रांचीमध्ये गुरुवारी बंद खोलीतून काका-पुतण्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी झारखंडमधील बोकारो येथे बंद खोलीतून 3 मृतदेह सापडले होते. हे तिन्ही मृतदेह पती, पत्नी आणि मुलाचे होते. तिघांच्याही तोंडातून फेस आला होता. त्यामुळे विषारी द्रव्य प्राशन केल्याने तिघांचाही मृत्यू झाला असावा, असा संशय बळावला. पती-पत्नी आणि मुलाचे मृतदेह एकत्र आढळल्याने गावात शांतता पसरली होती. कोणीही काही बोलायला तयार नव्हते. मुलाचे वय सुमारे 14 वर्षे असल्याचे सांगण्यात आले.

First published:

Tags: Jharkhand