हिमांशु अग्रवाल, प्रतिनिधी छतरपुर, 6 जून : देशात दिवसेंदिवस धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जेसीबीचे पार्ट उघडत असताना टायरचा स्फोट झाल्याने तरुणाचा वेदनादायक मृत्यू झाला. या घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मध्य प्रदेशातील छतरपूर सिव्हिल लाइन पोलीस स्टेशन परिसरातून ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हा तरुण जेसीबी मशिनचे पार्ट उघडत असताना जेसीबीचा टायर फुटला आणि या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा हृदय पिळवटून टाकणारा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे. भैयालाल रैकवार (रा. सांदनी, पोलीस स्टेशन बमिठा) असे मृताचे नाव आहे. मृत चंद्रपुरा येथील राहुल बुधौलिया याच्या राहुल स्टोन क्रशरमध्ये काम करायचा.
दरम्यान, तो जेसीबी मशिनचे पार्ट उघडत असताना जेसीबीच्या टायरचा स्फोट झाला आणि भैयालाल याचा या स्फोटात वेदनादायक मृत्यू झाला. यानंतर मृताचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कायदेशीर कारवाई करत आहेत.
दरम्यान, नातेवाईकांनी सांगितले की, मृत भैयालाल हा राहुल भदोरिया याच्या स्टोन क्रशरवर कामाला होता. तो जेसीबी मशिनचे टायर बदलण्यासाठी नट बोल्ट उघडत असताना टायर फुटून त्याचा जागीच मृत्यू झाला. या संपूर्ण प्रकरणाचा लाईव्ह सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर छतरपूरचे अतिरिक्त एसपी विक्रम सिंह यांनी सांगितले की, जेसीबी मशीनमध्ये यांत्रिक समस्या होती, ती दुरुस्ती करताना यात अपघात झाला. यामध्ये भैयालाल रक्कवार यांचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण प्रकरणातील पुराव्यांनुसार पोलीस कायदेशीर कारवाई करत आहेत.