जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना मोठं यश, ISJKच्या कमांडरचा खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये जवानांना मोठं यश, ISJKच्या कमांडरचा खात्मा

शोपियाँमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे.

  • Share this:

श्रीनगर, 10 मे : जम्मू-काश्मीरमधील शोपियाँ येथे सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठादेखील जप्त करण्यात आला आहे.

शोपियाँ जिल्ह्यातील गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली होती. यानुसार सुरक्षा दलानं शुक्रवारी (10 मे) पहाटे परिसरात शोधमोहीम राबवण्यास सुरुवात केली. शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली.

वाचा: 6 सर्जिकल स्ट्राईकचा दावा करणारी काँग्रेस तोंडघशी, संरक्षण मंत्रालयाचा धक्कादायक गौप्यस्फोट

या हल्ल्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं. दरम्यान, ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव इशाक सोफी (अब्दुल्ला) असून तो सोपोरमधील रहिवासी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच तो इस्लामिक स्टेट ऑफ जम्मू-काश्मीर संघटनेचा कमांडर असल्याचंही म्हटलं जात आहे.

वाचा :जम्मू काश्मीरमध्ये भाजप नेत्याची हत्या, दहशतवाद्यांनी जवळून मारल्या 5 गोळ्या

यापूर्वीही 3 मे रोजी शोपियाँ जिल्ह्यात चकमक झाली होती. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता.

वाचा :नरेंद्र मोदींनी का केलं राजीव गांधींना टार्गेट? पाहा हा SPECIAL REPORT

सैन्याला पूर्ण अधिकार

पुलवामा दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर सरकारनं भारतीय लष्कराला कारवाईचे पूर्ण अधिकार दिले आहेत. कारवाईदरम्यान जवान जखमी, शहीद होऊ नयेत यासाठी गाईड लाईन्सदेखील तयार करण्यात आली आहे. त्यानुसार कारवाई करा, असे आदेशदेखील देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये केलेल्या कारवाईमध्ये पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडसह अनेक टॉपच्या दहशतवाद्यांना यमसदनीस धाडण्यात आले आहे. दहशतवाद्यांविरोधातील मोहीमदेखील तीव्र स्वरुपात राबवली जात असून घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचादेखील जागच्या जागी खात्मा केला जात आहे.

VIDEO: ठाण्यात तुफान राडा, भाजप-मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली

First published: May 10, 2019, 7:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading