नवी दिल्ली, 07 मे : यूपीएच्या काळात 6 सर्जिकल स्ट्राईक झाल्याचा दावा करणारं काँग्रेस तोंडघशी पडल्याचं समोर आलं आहे. यूपीएच्या काळात 2016 च्या आधी एकही सर्जिकल स्ट्राईक झाल्याचा पुरावा नसल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. माहिती अधिकारात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. जम्मूतील माहिती अधिकार कार्यकर्ता रोहित चौधरी यांनी यूपीएच्या काळात किती सर्जिकल स्ट्राईक झाले होते? याची विचारणा केली. त्यावर 29 सप्टेंबर 2016 मध्ये लष्कराने केवळ एकच सर्जिकल स्ट्राइक केल्याचं संरक्षण मंत्रालयाच्या डीजीएमओनं स्पष्ट केलं आहे. 2004 ते 2014 दरम्यान सर्जिकल स्ट्राईक झालं नसल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. ‘काँग्रेसचे नेते सर्जिकल स्ट्राइकवरून खोटी माहिती देत होते. यूपीएच्या कार्यकाळात एकही सर्जिकल स्ट्राईक झालं नव्हतं,’ असं रोहितने सांगितलं. काँग्रेसने मात्र, यूपीएच्या कार्यकाळात 6 वेळा सर्जिकल स्ट्राईक झालं होतं. परंतु, त्याचा वापर मतं मिळविण्यासाठी करण्यात आला नसल्याचा दावा काँग्रेसने केला होता. वाचा : VIDEO : मोदींवर टीका करताना ममतांची जीभ घसरली UPAच्या कार्यकाळात 6 सर्जिकल स्ट्राईक; काँग्रेसने जाहीर केली होती यादी माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी सर्जिकल स्ट्राईक संदर्भात केलेल्या दाव्यानंतर काँग्रेसने संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या 6 सर्जिकल स्ट्राईकची यादीच जाहीर केली होती. यातील पहिला सर्जिकल स्ट्राईक 19 जानेवारी 2008रोजी, दुसरा 30 ऑगस्ट-1 सप्टेंबर, तिसरा 6 जानेवारी 2013, चौथा 27-28 जुलै 2013, पाचवा 6 ऑगस्ट 2013 आणि सहावा 23 डिसेंबर 2013 रोजी करण्यात आल्याचं म्हटलं होतं. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भारतीय लष्कराच्या शौर्याचा वापर मतं मिळवण्यासाठी करत असल्याचा आरोप काँग्रेस सातत्याने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केला. बुधवारी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सांगितले की, युपीएच्या कार्यकाळात देखील अनेक सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले होते. आम्ही शुत्रूला सडेतोड उत्तर देण्यासाठी त्याचा वापर केला होता. या गोष्टीचा वापर आम्ही कधीच मतं मिळवण्यासाठी केला नसल्याचे ते म्हणाले होते. याआधी निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अनेक प्रचार सभेत युपीएच्या कार्यकाळात अनेक सर्जिकल स्ट्राईक केल्याचे सांगितले होते. पण माजी पंतप्रधान सिंग यांनी प्रथमच सर्जिकल स्ट्राईक संदर्भात वक्तव्य केले होते. SPECIAL REPORT : ‘लाव रे तो व्हिडिओ’मुळे बदलले समिकरण, कुणाची उडवणार झोप?
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.