जम्मू काश्मीर, 04 मे : जम्मू काश्मीरमध्ये भाजपच्या गुल मोहम्मद मीर यांची हत्या करण्यात आली आहे. गुल मोहम्मद मीर हे अनंतनाग जिल्ह्यामध्ये भाजपचे उपाध्यक्ष आहेत. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी परिसरात नाकाबंदी केली आहे. शनिवारी रात्री 10च्या सुमारास त्यांच्यावर हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, अज्ञातांकडून 5 गोळ्या घालत गुल यांची हत्या करण्यात आली. गुल यांच्यावर खुप जवळून गोळीबार करण्यात आला. हल्लेखोरांनी 3 गोळ्या त्यांच्या छातीत झाडल्या तर 2 त्यांच्या पोटाला लागल्या. गोळ्या लागल्यानंतर गुल यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. पण, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला.
Jammu & Kashmir: A BJP worker Gul Mohd Mir has been shot dead by terrorists at Nowgam, Verinag in South Kashmir. Security forces have cordoned off the area. More details awaited. pic.twitter.com/y6RazAOC28
राज्यात गेल्या काही दिवसांआधी फुटीरवादी आणि काही राजकीय नेत्यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती. त्यात गुल मोहम्मद मीर यांचंदेखील नाव होतं. दरम्यान, यासंदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत.
VIDEO : राज ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, मनसेसैनिकांनी शिकवला चांगलाच धडा