नवी दिल्ली, 2 जानेवारी : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) वाढत आहे आणि त्यातच आता विद्यार्थ्यांनाही कोरोनाचा संसर्ग होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. जम्मू काश्मीरमधली माता वैष्णो देवी यूनिव्हर्सिटीतील 13 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. 13 विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याने जिल्हा प्रशासनाने यूनिव्हर्सिटी तात्काळ बंद करण्याचे निर्देश देले आहेत. 31 डिसेंबर 2021 रोजी विद्यार्थ्यांची कोरोना टेस्ट (Covid test of students) करण्यात आली होती आणि त्यात 13 विद्यार्थी कोविड पॉझिटिव्ह आढळून आले. देशभरातील विविध राज्यांत शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या घटना समोर येत आहेत. (Students tests positive for covid-19)
नैनीतालमध्ये 85 विद्यार्थी कोविड पॉझिटिव्ह
नैनीतालमधील जवाहर नवोदय विद्यालयातील तब्बल 85 विद्यार्थ्यांना कोरोनाच संसर्ग झाल्याने एच खळबळ उडाली आहे. या विद्यालयात आतापर्यंत एकूण 96 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. गेल्या दोन दिवसांत विद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांच्या कोविड टेस्ट करण्यात आल्या. आरोग्य विभागाने आतापर्यंत एकूण 496 जणांचे स्वॅब चाचणीसाठी पाठवण्यात आली आहे.
अहमदनगर, पुण्यानंतर सांगलीत कोरोनाचा उद्रेक
अहमदनगर (Ahmednagar) आणि पुण्यानंतर (Pune) सांगलीत विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील तब्बल 92 विद्यार्थिनी पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आधी 82 जण पॉझिटिव्ह आल्या होत्या. आता नवीन 10 जण कोरोना पॉझेटिव्ह आले आहेत. सर्वांना उपचारासाठी मिरजेच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.
वाचा : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला शिवसैनिकांकडून हरताळ; मुंबईत निर्बंध मोडत मालवणी जत्रोत्सव
महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद
राज्यात 1 जानेवारी रोजी दिवसभरात तब्बल 9 हजार 170 नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांमधील ही सर्वात मोठी रुग्णवाढ मानली जात आहे. विशेष म्हणजे आज मृत्यूचा आकडाही 7 वर पोहोचला आहे. दिवसभरात सात रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील सध्याचा मृत्यूदर हा 2.19 टक्के इतका आहे. तर दिवसभरात 1445 रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.35 टक्के इतकं आहे.
राज्यात 10 मंत्री, 20 आमदारांना Corona
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं, काळजी घ्या कोरोनामुळे स्थिती फार वेगाने खराब होतेय. राज्याचे 10 मंत्री आणि 20 पेक्षा जास्त नेते कोरोना बाधित आहेत. सगळ्यांना नियम पाळावे लागतात स्थिती जर आणखी बिघडली तर कठोर निर्णय घ्यावा लागेल. काल मुख्यमंत्र्यांनी तीन तास टास्कफोर्ससोबत बैठक घेतली. मुंबई, पुण्याची स्थिती तीन दिवसांत वेगाने बिघडली आहे. शर्यती, सार्वजनिक कार्यक्रम करू नका, गर्दी करू नका. मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय महत्वाचे आहेत राज्यात सगळ्यांनी त्याची अंमलबजावणी करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Jammu and kashmir, Students, महाराष्ट्र