मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अहमदनगर, पुण्यानंतर आता सांगलीत कोरोनाचा उद्रेक, वैद्यकीय महाविद्यालयातील 31 मुलींना Corona

अहमदनगर, पुण्यानंतर आता सांगलीत कोरोनाचा उद्रेक, वैद्यकीय महाविद्यालयातील 31 मुलींना Corona

Coronavirus news updates: सांगलीत कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. आता वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींना कोरनाचा संसर्ग झाला आहे.

Coronavirus news updates: सांगलीत कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. आता वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींना कोरनाचा संसर्ग झाला आहे.

Coronavirus news updates: सांगलीत कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. आता वैद्यकीय महाविद्यालयातील मुलींना कोरनाचा संसर्ग झाला आहे.

सांगली, 28 डिसेंबर : राज्यात कोरोना (Coronavirus in Maharashtra) बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. यासोबतच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग होताना दिसत आहे. अहमदनगर (Ahmednagar) आणि पुण्यानंतर (Pune) आता सांगलीत विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील तब्बल 31 विद्यार्थिनी पॉझिटीव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. (31 Girl students tests positive for covid19 in Sangli)

महाविद्यालय प्रशासन खडबडून जागे झाले असून सर्व विद्यार्थिनींच्या विविध चाचण्या घेण्यात येत आहेत. लक्षणे सौम्य असल्याचे सांगण्यात आले असले तरी राज्यात ओमायक्रॉनचे रूग्ण वाढत असतानाच हा प्रकार घडल्याने महाविद्यालय प्रशासनाचे सर्वच विभाग आता सतर्क झाला आहे.

मिरज वैद्यकीय महाविद्यालयातील आठ विद्यार्थिनींची सोमवारी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर विद्यार्थिनींची चाचणी करण्यात आली होती. त्यामध्ये सर्वजण पॉझिटिव्ह आल्या. त्यामुळे ही संख्या 31 वर गेली आहे. या विद्यार्थिनींमध्ये लक्षणे अतिशय सौम्य आहेत. विद्यार्थिनी कोणाच्या संपर्कात आणि कुठे गेल्या होत्या याचा कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे. मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनी कोरोना बाधित आढळल्याने पूर्ण हॉस्टेल प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहे.

तसेच विद्यार्थिनींमध्ये सौम्य लक्षणे असल्यामुळे काळजीचे काहीच कारण नाही. प्रशासन सतर्क असल्याचे  मिरज वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

वाचा : राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग

राज्यात ओमायक्रॉनचा उद्रेक

राज्यात दिवसेंदिवस ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. सोमवारी (27 डिसेंबर) सुद्धा राज्यात 26 ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक 11 रुग्ण आढळले आहे. तर नांदेडमध्ये सुद्धा 2 रुग्ण आढळले आहे. राज्यात आता ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्या 167 वर पोहोचली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने कोरोना परिस्थितीबद्दल माहिती दिली आहे. राज्यात 26 नवीन ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळले आहे. मुंबईमध्ये 11, रायगड 5 ठाणे 4 आणि नांदेडमध्ये 2 रुग्ण आढळले आहे. तर नागपूर, पालघर, भिवंडी आणि पुणे ग्रामीणमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

पुण्यात MIT महाविद्यालयातील 13 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

पुण्यातील नामांकित महाविद्यालयात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोथरुड येथील एमआयटीच्या मॅकॅनिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या 13 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. काल अहमदनगरमध्ये 52 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली होती.

पुण्यात सध्या कोरोनाचे दोन्ही डोस पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश दिला जात आहे. तरीही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समजतंय. कोरोनाबधित आढळून आलेले विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरील सुप्रा स्पर्धेची तयारी करत होते. एका बाधित विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या 25 विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली. त्या 25 पैकी 13 पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे.

First published:

Tags: Coronavirus, Sangli