मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mumbai: मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला शिवसैनिकांकडून हरताळ; मुंबईत निर्बंध मोडत मालवणी जत्रोत्सव

Mumbai: मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला शिवसैनिकांकडून हरताळ; मुंबईत निर्बंध मोडत मालवणी जत्रोत्सव

Photo: Twitter

Photo: Twitter

Malvani Jatra organised in Mumbai: कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारकडून निर्बंध लावण्यात येत आहेत. मात्र, त्याच दरम्यान मुंबईत चक्क जत्रोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 2 जानेवारी : मुंबईसह महाराष्ट्र आणि देशात कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus in Maharashtra) दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटनेही (Omicron variant of Coronavirus) चिंता वाढवली आहे. यामुळेच राज्य सरकारकडून निर्बंध (restrictions from state government) लावण्यास सुरुवात केली आहे. तसेच सरकार, प्रशासनाकडून कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे सांगण्यात येत आहे. पण असे असताना मुंबईत शिवसेनेकडून चक्क जत्रोत्सवाचे आयोजन (Jatra organised by Shiv Sena) करण्यात आले आहे. इतकेच नाही तर या जत्रोत्सवात नागरिकांनी तुफान गर्दी केल्याचंही दिसून आलं आहे. (Shiv Sena organised Malvani Jatrotsav in Andheri Mumbai)

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पाल करण्याचे आवाहन केले आहे. पण असे असताना मुंबईतील अंधेरी परिसरात शिवसेनेकडून मालवणी जत्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अंधेरीतील डी एन नगर परिसरात हे जत्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या क्रायक्रमात नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून येत आहे.

वाचा : या महिन्यात शिगेला पोहोचणार कोरोना रुग्णांची संख्या; रोज आढळणार 2 लाख रुग्ण?

जत्रोत्सवात नागरिकांनी गर्दी केल्यामुळे कोविड प्रतिबंधात्मक नियमांची सर्रास पायमल्ली होत असल्याचं दिसून येत आहे. या जत्रोत्सवात शनिवारी नागरिकांनी तुफान गर्दी केली होती. याचे फोटो आणि व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत आहेत. या जत्रोत्सवावरुन आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यात रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी आहे. मात्र, असे असताना सुद्धा शिवसेनेकडून जत्रोत्सवाचे आयोज करण्यात आले. इतर नागरिकांसाठी वेगळे नियम आणि शिवसेनेला विगळे नियम का? या जत्रोत्सवाला मुंबई महानगरपालिका, पोलीस आणि राज्य सरकारकडून परवानगी कशी देण्यात आली? असे सवाल आता उपस्थित होत आहेत.

महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद

राज्यात 1 जानेवारी रोजी दिवसभरात तब्बल 9 हजार 170 नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांमधील ही सर्वात मोठी रुग्णवाढ मानली जात आहे. विशेष म्हणजे आज मृत्यूचा आकडाही 7 वर पोहोचला आहे. दिवसभरात सात रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील सध्याचा मृत्यूदर हा 2.19 टक्के इतका आहे. तर दिवसभरात 1445 रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97.35 टक्के इतकं आहे.

First published:

Tags: Coronavirus, Mumbai, Shiv sena