मराठी बातम्या /बातम्या /देश /उरीमध्ये मोहीम फत्ते! 18 वर्षांच्या दहशतवाद्याला जिवंत पकडलं, दुसऱ्याचा खात्मा, पैशासाठी लष्कर-ए-तोयबात झाला होता सामील

उरीमध्ये मोहीम फत्ते! 18 वर्षांच्या दहशतवाद्याला जिवंत पकडलं, दुसऱ्याचा खात्मा, पैशासाठी लष्कर-ए-तोयबात झाला होता सामील

काश्मीर सीमेतून (Uri) घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडणारी लष्कराची ही विशेष मोहीम 10 दिवस सुरू होती. शेवटी या 18 वर्षांच्या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश आलं. पैशाच्या लालसेने लष्कर ए तैयबात झाला होता सामील.

काश्मीर सीमेतून (Uri) घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडणारी लष्कराची ही विशेष मोहीम 10 दिवस सुरू होती. शेवटी या 18 वर्षांच्या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश आलं. पैशाच्या लालसेने लष्कर ए तैयबात झाला होता सामील.

काश्मीर सीमेतून (Uri) घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडणारी लष्कराची ही विशेष मोहीम 10 दिवस सुरू होती. शेवटी या 18 वर्षांच्या दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात यश आलं. पैशाच्या लालसेने लष्कर ए तैयबात झाला होता सामील.

   उरी, 28 सप्टेंबर: जम्मू-काश्मिरातल्या (Jammu & Kashmir) उरी (Uri attack) भागात सुरू असलेली भारतीय लष्कराची 10 दिवसांची विशेष मोहीम मंगळवारी (28 सप्टेंबर) संपली. त्यात 18 वर्षांच्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याला (Pakistani Infiltrator) जिवंत पकडण्यात आलं, तर अन्य एका घुसखोराचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. हा 18 वर्षांचा तरुण पैशाच्या लालसेने लष्कर ए तोयबा (lashkar-e-taiba) या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता.

  उरी आणि ताबा रेषेवरच्या (LoC) अन्य जवळच्या भागांत सुरू असलेला घुसखोरीचा (Infiltration Bid) प्रयत्न हाणून पाडण्यासाठी लष्कराने (Army Operation) विशेष मोहीम हाती घेतली होती. ती 18-19 सप्टेंबर रोजी सुरू झाली होती. त्यामुळे या भागातली मोबाइल, टेलिफोन आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी खंडित करण्यात आली होती.

  लष्कराच्या सूत्रांनी रविवारी (26 सप्टेंबर) सीएनएन-न्यूज18ला दिलेल्या माहितीनुसार, दोन घुसखोर मारले गेले असण्याची शक्यता असून, त्यांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत. या चकमकीत चार जवानही जखमी झाले.

  लष्कराने याबद्दल दिलेल्या माहितीनुसार, 'गडद काळोखी रात्र, समतल नसलेला प्रदेश, खराब हवामान आदींचा फायदा घेऊन लष्कर-ए-तैयबा (Lashkar E taiba) या पाकिस्तानातल्या दहशतवादी संघटनेच्या सहा दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या जब्री (Jabri) या ठाण्याच्या सर्वसाधारण प्रदेशातून घुसखोरीचा प्रयत्न केला. घुसखोरीचा प्रयत्न सुरू असताना पॅट्रोलिंग करणाऱ्या जवानांशी संपर्कात आल्यावर चार दहशतवादी ताबा रेषेवरून पाकव्याप्त काश्मिरात (PoK) पळून गेले. उर्वरित दोघांनी आपल्या बाजूला प्रवेश केला. घुसखोरी करण्यासाठी दहशतवाद्यांनी सवाई नाला टेररिस्ट कॅम्प ते हल्लान शुमाली लाँच पॅड ते जब्री ते सलामाबाद नाला हा मार्ग वापरला. 2016 साली उरी गॅरिसनवर आत्मघातकी हल्ला करण्यासाठी आलेल्या दहशतवाद्यांनीही पाकिस्तानी लष्कराच्या मदतीने सलामाबाद नाल्याच्या मार्गेच घुसखोरी केली होती, हे नोंद घेण्यासारखं आहे.'

  वरिष्ठ IAS अधिकाऱ्याच्या सरकारी निवासस्थानात धर्मांतराचे पाठ; VIDEO आला समोर

  एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश आलं असून, त्याचं नाव आतिक उर रहमान ऊर्फ कारी अनास (33) असं होतं. तो पाकिस्तानातल्या पंजाबातल्या अॅटॉक जिल्ह्यात राहणारा होता. 18 वर्षांच्या एका दहशतवाद्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याबद्दल लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, तो ओकारा जिल्ह्यातल्या दिपालपूरचा रहिवासी असून, त्याच्या गरिबीमुळे त्याला आमिष दाखवून आणि चुकीचं मार्गदर्शन करून लष्कर ए तैयबामध्ये सामील करून घेण्यात आलं. त्याचे वडील तो लहान असतानाच वारले. दिपालपूरमध्ये त्याची आई आणि दत्तक घेतलेली बहीण असं त्याचं कुटुंब राहतं. जेमतेम टोकास टोस लागेल अशा प्रकारे त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे.

  चीनची उत्तराखंडमध्ये घुसखोरी? घोड्यावरून आलेले 100 सैनिक

  'गरिबीवर मात करण्यासाठी त्याने सातवीतूनच सरकारी शाळा सोडली. 2019 साली त्याने गढी हबीबुल्ला कॅम्पमध्ये दहशतवादाबद्दलचं प्राथमिक शिक्षण घेतलं. 2021 साली रिफ्रेशर ट्रेनिंग झालं. शारीरिक शिक्षण, तसंच शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण देण्यासाठी तिथे नेमलेले बरेचसे इन्स्ट्रक्टर्स हे पाकिस्तानी लष्करातले जवान होते. त्या 18 वर्षांच्या दहशतवाद्याने दिलेल्या माहितीनुसार आतिक उर रहमानने त्याला आईवरच्या उपचारांसाठी 20 हजार रुपये दिले. तसंच बारामुल्लाजवळच्या पट्टाणजवळून सुरक्षितरीत्या परतल्यास आणखी 30 हजार रुपये देणार असल्याचं आश्वासनही आतिकने दिल्याचं त्याने सांगितलं. बारामुल्लाजवळच्या पट्टाण इथे त्यांना काही कामगिरी करण्यास सांगण्यात आलं होतं.'

  काश्मीर खोऱ्यात करण्यात आलेल्या घुसखोरीच्या अनेक प्रयत्नांपैकी हा एक होता. अलीकडेच राजौरीच्या पीर पंजाल भागातही घुसखोरीचे काही प्रयत्न करण्यात आले होते. तिथे लष्कराचे जवान आणि घुसखोरांच्यात काही चकमकीही झाल्या होत्या.

  काश्मीर खोऱ्यातल्या 15 कॉर्प्सचे प्रमुख ले. जन. डी. पी. पांडे यांनी एका कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बोताना सांगितलं, की या वर्षी शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं नसलं, तरी घुसखोरीचे काही प्रयत्न मात्र करण्यात आले. आम्ही पुरेसे दक्ष असून, घुसखोरी कमीत कमी असेल, याची आम्ही काळजी घेऊ.

  अफगाणिस्तानातल्या घडामोडींनंतर नव्याने घुसखोरीचे काही प्रयत्न झाले का, असं विचारलं असता, ले. जन. डी. पी. पांडे म्हणाले, 'लष्कर एकदम दक्ष आहे. पाकिस्तानच्या अॅटिट्यूडमध्ये या महिन्यात बदल अपेक्षित असून, हिवाळ्याच्या प्रारंभावेळी घुसखोरीची शक्यता आहे. याचा संबंध भू-राजकीय परिस्थितीशी जोडावा असं मला वाटत नाही. काहीही झालं, तरी असे प्रयत्न आम्ही उधळून लावू.'

  First published:
  top videos

   Tags: Indian army, Infiltration