मराठी बातम्या /बातम्या /india-china /सैन्य माघारीस सहमती देऊनही चीनची उत्तराखंडमध्ये घुसखोरी? घोड्यावरून आलेल्या सैनिकांंचं मोठं कारस्थान

सैन्य माघारीस सहमती देऊनही चीनची उत्तराखंडमध्ये घुसखोरी? घोड्यावरून आलेल्या सैनिकांंचं मोठं कारस्थान

उत्तराखंडच्या (Uttarakhand) बाराहोटी (Barahoti) भागात चीनचे 100 सैनिक घोड्यावरून आले होते आणि तीन तास ते त्या भागात होते. परंतु भारतीय सैन्याशी त्यांचा आमनासामना झाला नाही

उत्तराखंडच्या (Uttarakhand) बाराहोटी (Barahoti) भागात चीनचे 100 सैनिक घोड्यावरून आले होते आणि तीन तास ते त्या भागात होते. परंतु भारतीय सैन्याशी त्यांचा आमनासामना झाला नाही

उत्तराखंडच्या (Uttarakhand) बाराहोटी (Barahoti) भागात चीनचे 100 सैनिक घोड्यावरून आले होते आणि तीन तास ते त्या भागात होते. परंतु भारतीय सैन्याशी त्यांचा आमनासामना झाला नाही

    नवी दिल्ली 28 सप्टेंबर : भारताशी (India) सलोख्याचे संबंध राखण्यासाठी उत्सुक असल्याचं चीन (China) दर्शवत असला तरी प्रत्यक्षात सीमा रेषेवर (LAC-Line of Actual Control) मात्र चीन वारंवार आगळीक करत असल्याचं दिसतं. गलवान खोऱ्यातल्या हिंसाचारानंतर इथं शांतता निर्माण व्हावी यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर सैन्य माघारीस सहमती देणाऱ्या चीननं प्रत्यक्षात मात्र आपली कुरापतखोर भूमिका सोडलेली दिसत नाही. 30 ऑगस्ट रोजीदेखील चीनच्या 100 सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचं नुकतंच उघडकीस आलं आहे.

    उत्तराखंडच्या (Uttarakhand) बाराहोटी (Barahoti) भागात चीनचे 100 सैनिक घोड्यावरून आले होते आणि तीन तास ते त्या भागात होते. परंतु भारतीय सैन्याशी त्यांचा आमनासामना झाला नाही. या सैनिकांनी इथला एक पादचारी पूलही नष्ट केला. लष्कर आणि भारत-तिबेट सीमारेषा पोलीस दलाचे (आयटीबीपी-ITBP) जवान आले, तोपर्यंत चिनी सैनिक निघून गेले, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे; मात्र या वृत्ताला उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दुजोरा दिलेला नाही. सरकारकडे अशी कोणतीही माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

    चीनमध्ये भयंकर वीज संकट! कारखाने-मॉल्स बंद, लोकांना पाणी गरम करण्यासह बंदी

    भारत आणि चीन यांच्यातल्या तणावपूर्ण संबंधाच्या पार्श्वभूमीवर ही घटना चीनच्या आक्रमक धोरणाचं दर्शन घडवत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनने आपल्या सैनिकांना राहण्यासाठी आठ ठिकाणी अत्याधुनिक मॉड्युलर कंटेनर आधारित ठाणी उभारली आहेत.

    भारत आणि चीन या दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळच्या संवेदनशील भागात आपले 50 हजार सैनिक तैनात केले असून, हॉवित्झर तोफा, रणगाडे आणि जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रंही इथं सज्ज ठेवण्यात आली आहेत. अतिशय दुर्गम आणि ऑक्सिजनची कमतरता असलेल्या या सीमा भागात तणावाचं वातावरण कायम आहे. त्यामुळे दोन्ही देश आपल्या सैन्याच्या तुकड्या वारंवार बदलत, विमान आणि ड्रोन यांच्या साह्याने आपलं लष्करी सामर्थ्य कायम राखत आहेत.

    अमेरिकेत तुटला 246 वर्षांचा इतिहास, शीख नौदल अधिकाऱ्याला पगडी घालण्याची परवानगी

    पूर्व लडाखमध्ये (East Ladakh) गेल्या वर्षी मे महिन्यात पॅगॉन्ग तलाव (Pangong Lake) परिसरात झालेल्या हिंसक चकमकीनंतर दोन्ही देशांमधल्या लष्करी आणि राजनैतिक पातळीवरील चर्चेचा परिणाम म्हणून, दोन्ही बाजूंनी फेब्रुवारीमध्ये पॅगॉन्ग तलावाच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यांवरून सैन्य माघारीस सुरुवात करण्यात आली. गेल्या महिन्यात गोगरा भागातूनही सैन्य मागं घेण्यात आलं. यामुळे या प्रदेशात पुन्हा शांतता स्थापन करण्याच्या दिशेने पाऊल पुढं पडलेलं असताना चीनची ही आगळीक या प्रयत्नांमध्ये खोडा ठरू शकते.

    First published:
    top videos

      Tags: China, India china