उत्तर प्रदेश, 25 डिसेंबर: उत्तर प्रदेशातील कानपूर शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh News) कानपुरमध्ये अत्तर व्यावसायिक (Perfume Businessman) आणि सपा नेता (Samajwadi Leader) पीयूष जैनच्या घरात इन्कम टॅक्स विभागानं छापा टाकला. अत्तर व्यापारी पियुष जैन यांच्या घरातून सापडलेल्या नोटांची मोजणी पूर्ण झाली. यावेळी IT विभागानं जैन यांच्या घरातून तब्बल एकूण 177.45 कोटी जप्त केलेत. गुरुवारी दुपारी इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या टीमने जैनच्या घरी रेड टाकली होती.
DGGI नं दोन टप्प्यात 180 कोटींची रक्कम पाठवली. हे पैसे स्टेट बँक ऑफ इंडियाची मुख्य शाखा पोलीस आणि पीएसी अंतर्गत पाठवण्यात आले. पहिल्या टप्प्यात 25 बॉक्स आणि दुसऱ्या टप्प्यात 18 बॉक्स पाठवले. SBI कडून 19 नोट मोजणी मशीन देखील पाठवण्यात आल्या. डीजीजीआयनं ही छापेमारी केली आहे. आतापर्यंत कोणत्याही छाप्यामधली ही सर्वाधिक रोख वसुली आहे.
हेही वाचा- Pro Kabaddi League: दिल्ली ठरली मुंबईवर 'दबंग', पिछाडीनंतरही दिला धक्का
DGGI च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातून काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे सापडली आहेत. त्याची फॉरेन्सिक तपासणी केली जाणार आहे.
पीयूष जैन यांच्या घरातून 177.45 कोटी रुपये जप्त केले असून ही आतापर्यंतची सर्वाधिक वसुली आहे. याआधी तामिळनाडूमध्ये सर्वाधिक 163 कोटी रुपयांची वसुली झाली होती.
काय आहे नेमकं प्रकरण
कानपूरचे व्यापारी पियुष जैन यांच्या घरावर छापा टाकून 177 कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आली आहे. आता जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) अधिकाऱ्यांनी एवढी मोठी रक्कम सुरक्षितपणे नेण्यासाठी चलनी नोटा घेऊन जाणाऱ्या कंटेनरची व्यवस्था केली होती.
पैसे नेण्यासाठी कंटेनरची गरज
गुरुवारी, जीएसटी गुप्तचर महासंचालनालय म्हणजेच डीजीजीआय आणि आयकर विभागाने कन्नौजचे अत्तर व्यावसायिक पीयूष जैन यांच्या घरावर छापा टाकला. या दरम्यान कपाटात इतके पैसे सापडले की नोटा मोजण्याचे यंत्र मागवण्यात आले. एकूण आठ मशीनद्वारे पैसे मोजण्यात आले.
आधी सुरुवातीचा आकडा 150 कोटींच्या आसपास सांगितला जात होता. ही रोकड सुरक्षितपणे नेण्यासाठी एका मोठ्या कंटेनरची व्यवस्था करण्यात आली होती. या छाप्याची फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. प्रत्येक फोटोत फक्त रोख रक्कम दिसते. नोटांचे इतके बंडल सापडले आहेत की लोकांना बँकेकडे मदतीसाठी फोन करावा लागत आहे.
आनंदपुरी भागात पीयूष जैनच्या घरात मोठ मोठ्या कार्टन्स भरलेल्या नोटा सापडल्या. याचे काही फोटोदेखील समोर आले आहेत. विशेष म्हणजे पीयूष जैन अखिलेश यादवचे जवळचे आहेत आणि गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी समाजवादी अत्तर लॉन्च केलं होतं.
अखिलेशच्या जवळचे आहेत पीयूष जैन..
व्यावसायिक पीयूष जैन सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या जवळचे आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी समाजवादी पार्टीच्या नावावरुन अत्तर लॉन्च केलं होतं. यामुळे ते चर्चेत होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीयूष जैन यांच्या नावावर 40 कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून टॅक्स चोरी केली गेली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Uttar pradesh news