बिहार, 25 डिसेंबर: बिहारमधील (Bihar) मधेपुरा (Madhepura) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीनं तीन महिन्यांपासून पतीचे अपहरण करून खून केल्याची तक्रार विविध पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र आता अचानक पती जिवंत समोर आला आहे. या संपूर्ण कथेमागे कुटुंबात सुरू असलेल्या वादामागील कटाची मोठी कहाणी समोर आली आहे.जे ऐकल्यावर कोणाच्याही अंगावर काटा उभा राहिल. त्यानंतर असं कोणी करू शकतं असा विचार करायला लोकांना भाग पडेल.
संपूर्ण कुटुंबाला फसवण्याचा प्लान
हे प्रकरण मधेपुराच्या सिंहेश्वर पोलीस ठाण्याचे आहे. जिथे मृत पतीची पत्नी रीना देवी हिने आपला पती सुधीर सिंह यांची हत्या आणि अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली होती. रीना देवी यांनी FIR मध्ये पाच जणांची नावे दिली होती. रीना देवी यांनी आरोप केला होता की, तिच्यावर बलात्कार केल्यानंतर आरोपींनी पतीचे अपहरण करून त्याची हत्या केली. रीनाने न्यायासाठी पोलिसांसह आरोपींच्या अटकेसाठी बड्या लोकांकडे विनवणी सुरू केली.
PMO आणि SP, DGP यांना पत्र
कुटुंबीयांवर पतीच्या हत्येचा आरोप केल्यानंतर रीना देवी यांनी पीएमओ, एसपी आणि डीजीपी यांना पत्र लिहून त्यांच्या अटकेची विनंती केली होती. तक्रारीनंतर सिंहेश्वर पोलीस ठाण्यात आरोपीच्या नातेवाईकांना सतत त्रास दिला जात होता. त्यानंतर आरोपीच्या नातेवाईकांनी मृत सुधीर सिंहचा शोध सुरू केला. नातेवाईकांनी सुधीर सिंहचा नेपाळपर्यंत शोध घेतला, मात्र काहीही मिळाले नाही.
हेही वाचा- IT चा सर्वात मोठा छापा, अत्तर व्यापाऱ्याच्या घरात सापडलं 177 कोटींचं घबाड
ख्रिश्चन मिशन रुग्णालयात सापडला 'मृत' पती
रीना देवीच्या कटात चारही बाजूंनी घेरलेल्या आरोपीच्या नातेवाईकांनी सुधीर सिंहचा नव्यानं शोध सुरू केला. प्रत्येक गल्ली, भागात आणि परिसरात सुधीर सिंह यांचे फोटो वितरित केले. अचानक आरोपीच्या नातेवाईकांना माहिती मिळाली की कथित मृत सुधीर सिंह हा त्याच्या सासऱ्यांसोबत ख्रिश्चन मिशन रुग्णालयात दाखल आहे आणि तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्यानंतर आरोपीच्या नातेवाईकांनी अनेक दिवस सुधीर सिंहची रेकी केली आणि त्यानंतर पोलिसांना माहिती दिली.
पती- पत्नीनं रचला होता कट
या संपूर्ण प्रकरणाचे तपास अधिकारी आयओ उमेश यादव यांनी सांगितले की, पीडित आरोपी अचानक ख्रिश्चन मिशन रुग्णालयात पोहोचले. तिथे त्यांना सुधीर सिंह पूर्णपणे तंदुरुस्त आणि जिवंत दिसला. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोप करणाऱ्या कथित मृत आणि त्याची पत्नी रीना देवी यांची चौकशी केली. या कटामागील हेतू केवळ गोवण्याचा होता की आणखी काही होता, या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस पुन्हा तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar