श्रीनगर, 21 नोव्हेंबर: जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. सध्या पुलवामा पोलीस (Pulwama police) दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील अनेक ग्रेनेड (grenade attacks) हल्ल्यांशी संबंधित प्रकरणांचा तपास करत आहेत. याचा तपास करत असताना दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाच्या (Lashkar-e-Taiba) सक्रिय सहकार्यांचे नेटवर्क उघड झालं आहे. पोलिसांनी तपासादरम्यान पाच दहशतवाद्यांना अटक केली आहे. शौकत इस्लाम डार, एजाज अहमद लोन, एजाज गुलजार लोन, मंजूर अहमद भट आणि नसीर अहमद शाह अशी त्यांची नावे असल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, हे मॉड्यूल स्लीपर सेल म्हणून काम करत होते. शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा खरेदी तसंच वाहतुकीमध्ये गुंतले होते. हेही वाचा- ‘ आधी तुझ्या मुलांना बॉर्डरवर पाठव, त्यानंतरच…’ गंभीरनं दिला सिद्धूला सल्ला अटक करण्यात आलेले दहशतवादी त्यांच्या पाकिस्तानी सल्लागाऱ्यांच्या सांगण्यावरून सुरक्षा दलांवर झालेल्या अनेक ग्रेनेड हल्ल्यांमध्ये सहभाग होते. त्यांच्याकडून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा यासह घातक साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी काकापोरा पोलीस ठाण्यात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुलगाममध्ये हिज्बुल कमांडर ठार शनिवारी जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीनचा नवनियुक्त जिल्हा कमांडर ठार झाला. दक्षिण काश्मीरच्या अशमुजी भागात दहशतवादी असल्याच्या गुप्त माहितीवरून सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली, असे पोलीस प्रवक्त्याने सांगितलं. दहशतवाद्यांनी केला अंदाधुंद गोळीबार ऑपरेशन दरम्यान, दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची भरपूर संधी देण्यात आली होती. मात्र त्यांनी त्याऐवजी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करून संयुक्त पथकांनी त्यांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलं. गोळीबारानंतर प्रत्युत्तरादाखल करण्यात आला, ज्यामुळे चकमक सुरू झाली, असंही त्यांनी सांगितलं. हेही वाचा- दोन महिन्यांपूर्वी अपहरण, खंडणी देऊनही तालिबाननं रस्त्यावर फेकला डॉक्टरचा मृतदेह पुढे पोलीस प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिज्बुल मुजाहिद्दीनचा नवनियुक्त जिल्हा कमांडर मुदासीर वागे या चकमकीत मारला गेला. तो कुलगाममधील मालवानचा रहिवासी होता आणि त्याचा मृतदेह चकमकीच्या ठिकाणाहून जप्त करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.