मराठी बातम्या /बातम्या /देश /'आधी तुझ्या मुलांना बॉर्डरवर पाठव, त्यानंतरच...' गंभीरनं दिला सिद्धूला सल्ला

'आधी तुझ्या मुलांना बॉर्डरवर पाठव, त्यानंतरच...' गंभीरनं दिला सिद्धूला सल्ला

टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धू  (Navjot Singh Sidhu) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) आमने-सामने आले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान (Imran Khan) याचं कारण आहे.

मुंबई, 21 नोव्हेंबर: टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धू  (Navjot Singh Sidhu) आणि गौतम गंभीर (Gautam Gambhir) आमने-सामने आले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान (Imran Khan) याचं कारण आहे. इम्रान हे माझे मोठे भाऊ असल्याचा दावा सिद्धू यांनी केला आहे. त्यावर गंभीरनं सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेप घेतला आहे. त्याचबरोबर त्याचा संबंध भारत-पाकिस्तान यांच्यातील संबंध आणि सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीशी देखील जोडला आहे.

भाजपा नेते अमित मालवीय यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या व्हिडीओत पाकिस्तानचे अधिकारांनी नवजोत सिद्धूचे जोरदार स्वागत करत आहेत. सिद्ध पाकिस्तानच्या हद्दीत असलेल्या दरबार साहिब गुरुद्धावारात दर्शन घ्यायला गेले होते. त्यावेळी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यावेळी, 'इम्रान खान माझे मोठे भाऊ आहेत, त्यांना खूप प्रेम', असे वक्तव्य सिद्धूंनी केले.

अमित मालवीय यांनी या व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हंटलं आहे की, 'राहुल गांधींचे आवडते नेते नवजोत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तनच्या पंतप्रधानांना मोठा भाऊ असल्याचं म्हटंल आहे. नवजोत यांनी पाकिस्तानतचे लष्करप्रमुख जनरल बाजवा यांची मागच्यावेळी गळाभेट घेतली होती. त्याची बरीच प्रशंसा झाली.'

माजी क्रिकेटपटू आणि भाजपा खासदार गौतम गंभीरनं या विषयावर ट्विट केलं आहे.'तुमचा मुलगा किंवा मुलीला बॉर्डरवर पाठव. त्यानंतरच एखाद्या दहशतवादी देशाच्या प्रमुखाला मोठा भाऊ म्हणं.' या ट्विटमध्ये गंभीरनं कुणाचंही नाव घेतलेलं नाही. पण, त्याचा इशारा सिद्धूकडे आहे असं मानलं जात आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध गेल्या अनेक दिवसांपासून तणावपूर्ण आहेत. त्याचा परिणाम क्रिकेटवरही झाला आहे. दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय क्रिकेट सीरिज झालेली नाही. दोन्ही देशांच्या टीम आयसीसीच्या स्पर्धा किंवा आशिया कपमध्येच एकमेकांच्या समोर येतात.

अक्षयच्या 'सूर्यवंशी'ला घाबरला पाकिस्तान? पाक राष्ट्रपतींच्या आक्षेपांमागे काय आहे कारण?

First published:

Tags: Gautam gambhir, India, Pakistan