श्रीनगर, 16 डिसेंबर: जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) श्रीनगरमध्ये (Srinagar) पोलीस दलावर झालेल्या दहशतवादी (terrorist attack) हल्ल्यानंतर सुरक्षा दल (Security forces) अॅक्शन मोडमध्ये आहे.या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली आहे. गेल्या 24 तासांत लष्कराने 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी (Jammu and Kashmir police) गुरुवारी ही माहिती दिली. कुलगाम (Kulgam district) जिल्ह्यातील रेडवानी भागात काल रात्री सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक सुरू झाली. दोन दहशतवाद्यांना ठार केल्यानंतरही कारवाई सुरूच आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाला रेडवानी कुलगाममध्ये दोन दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर बुधवारी संध्याकाळी सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं. यादरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये गोळीबार सुरू झाला, ज्यामध्ये अनेक तासांच्या गोळीबारानंतर दोन्ही दहशतवादी ठार झाले.
हेही वाचा- नेत्याची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या, छातीत झाडल्या दोन गोळ्या
मात्र, आतापर्यंत दहशतवाद्यांबाबत फारशी माहिती समोर आलेली नाही. दहशतवाद्यांची नावे काय होती आणि ते कोणत्या संघटनेशी संबंधित होते, याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही.
बुधवारी सुरक्षा दलांनी पुलवामामध्ये हिजबुल मुजाहिद्दीनच्या 1 दहशतवाद्याचा खात्मा केला होता. हा हिजबुल दहशतवादी अ श्रेणीचा होता. त्याची ओळख फिरोज अहमद दार असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिरोज अहमद दार 2018 मध्ये शोपियान जैनपोरा येथे झालेल्या हल्ल्यासह अनेक दहशतवादी घटनांमध्ये सामील होता. या हल्ल्यात जम्मू-काश्मीरचे चार पोलीस शहीद झाले होते. लष्करानं 24 तासांत 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यापैकी पुलवामामध्ये एक दहशतवादी मारला गेला असून कुलगाममध्ये दोन दहशतवादी मारले गेले आहेत.
हेही वाचा- वाऱ्यासारखा पसरतोय Omicron,महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेची शक्यता?
सोमवारी संध्याकाळी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधील जेवान भागात दहशतवाद्यांनी पोलीस दलावर हल्ला केला. दहशतवाद्यांनी पोलिसांच्या बसला घेरलं आणि गोळीबार केला. या हल्ल्यात तीन पोलीस शहीद झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.