मराठी बातम्या /बातम्या /देश /घरी परतत असताना नेत्याची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या, छातीत झाडल्या दोन गोळ्या

घरी परतत असताना नेत्याची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या, छातीत झाडल्या दोन गोळ्या

झारखंडची (Jharkhand)  राजधानी रांची (Ranchi)  येथून मोठी बातमी येत आहे.

झारखंडची (Jharkhand) राजधानी रांची (Ranchi) येथून मोठी बातमी येत आहे.

झारखंडची (Jharkhand) राजधानी रांची (Ranchi) येथून मोठी बातमी येत आहे.

रांची, 16 डिसेंबर: झारखंडची (Jharkhand) राजधानी रांची (Ranchi) येथून मोठी बातमी येत आहे. विश्व हिंदू परिषदेच्या (Vishwa Hindu Parishad) नेत्याची हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे खलारी ब्लॉक अध्यक्ष मुकेश सोनी (Mukesh Soni) यांची बुधवारी खलारी पोलीस स्टेशन हद्दीतील मॅक्लुस्कीगंजजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

असं सांगण्यात येत आहे की, मुकेश सोनी हे खलारी येथील महावीर नगरमध्ये राहत होते आणि मॅक्लुस्कीगंज येथील धुर्वा मोरजवळ प्रधान ज्वेलर्स नावाचं दागिन्यांचं दुकान होतं.

संध्याकाळी ते दुकान बंद करून घरी परत जात होते. दरम्यान, बकुळीया तांडजवळ त्याच्या छातीत दोन गोळ्या झाडण्यात आल्या. एका वाटसरूच्या माहितीवरून काही लोकांनी घटनास्थळ गाठून जखमी मुकेश सोनी यांना डाक्रा रुग्णालयात नेलं, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

 हेही वाचा- वाऱ्यासारखा पसरतोय Omicron,महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेची शक्यता?

मुकेशच्या हत्येची माहिती मिळताच संपूर्ण खलारीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. अलीकडच्या काळात मुकेश फायर ब्रँड हिंदू नेता म्हणून आपली छाप पाडत होते. स्थानिक आमदार समरीलाल यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला असून या घटनेच्या निषेधार्थ उद्या विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जाणार नसून खलारी येथे जाणार असल्याचं सांगितलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

झारखंडचे केरळ आणि बंगाल बनवण्याचा डाव

विश्व हिंदू परिषद खलारी ब्लॉक अध्यक्ष मुकेश सोनी यांचीगोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी खासदार संजय सेठ यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. भाजप, आरएसएस, विश्व हिंदू परिषद या संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना लक्ष्य केलं जात आहे. भाजप आणि संघ विचार परिवाराच्या कार्यकर्त्यांना टार्गेट केलं जात असल्याचं खासदार म्हणाले. त्यांना टार्गेट करून नुकसान केलं जात आहे. त्यांची हत्या केली जात आहे. झारखंडचे केरळ आणि पश्चिम बंगाल बनवण्याचे षडयंत्र सुरू असल्याचं खासदार यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Crime news, Jharkhand