Home /News /kolhapur /

Gokul Milk Price Hike: ग्राहकांच्या खिशाला चाप..! गोकुळची दूध दरवाढ, असे असतील नवे दर

Gokul Milk Price Hike: ग्राहकांच्या खिशाला चाप..! गोकुळची दूध दरवाढ, असे असतील नवे दर

गोकुळच्या दूध दरासंदर्भात (Gokul Milk Price Hike) मोठी बातमी समोर आली आहे.

    कोल्हापूर, 14 डिसेंबर: गोकुळच्या दूध दरासंदर्भात (Gokul Milk Price Hike) मोठी बातमी समोर आली आहे. गोकुळनं आज आपल्या दूध विक्री किंमतीत 2 रुपयांची वाढ केली आहे. शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरामध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ करण्यात आली आहे. यापुढे ‘गोकुळ’च्या दुधाची ग्राहकांसाठी विक्री किंमत ही 48 रुपये लीटर अशी राहणार असल्याचं संघाच्या वतीनं कळविण्यात आलं आहे. हे दर आजपासून अंमलात येणार आहे. शेतकऱ्यांच्या दूध खरेदी दरामध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर गोकुळनं दूध विक्री किंमतीत 2 रुपयांची वाढ केली. ही दर 14 डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून अंमलात आले आहेत. हे नवे दर मुंबई शहर आणि उपनगर, नवी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यात लागू करण्यात आलेत. गोकुळ दूधाचे नवे दर खालीलप्रमाणे याचवर्षी जुलै महिन्यात गोकुळ दुधाच्या खरेदी-विक्रीच्या किंमतीत वाढ होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर नवे दर 11 जुलै पासून लागू करण्यात आले. जुलै महिन्यातही गोकुळ दूध उत्पादकांकडून म्हशीच्या दूध खरेदीच्या किंमतीत 2 रुपये तर गायीच्या दूध दरात 1 रुपयांनी वाढ केल्याचा निर्णय घेतला होता. हेही वाचा- श्रीनगर दहशतवादी हल्ल्याप्रकरणी सर्वात धक्कादायक माहिती समोर त्यामुळे पुन्हा एकदा गोकुळ दुधाच्या खरेदी विक्रीत वाढ झाल्यानं ग्राहकांना चांगलाच फटका बसणार आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Kolhapur

    पुढील बातम्या