मराठी बातम्या /बातम्या /देश /

Srinagar Terrorist Attack: बुलेट प्रूफ नव्हती जवानांची बस, शस्त्रंही नव्हती हातात; 12 जवान जखमी

Srinagar Terrorist Attack: बुलेट प्रूफ नव्हती जवानांची बस, शस्त्रंही नव्हती हातात; 12 जवान जखमी

जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir)  श्रीनगर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यानं (terrorist attack)  हादरलं.

जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) श्रीनगर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यानं (terrorist attack) हादरलं.

जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) श्रीनगर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यानं (terrorist attack) हादरलं.

  • Published by:  Pooja Vichare

श्रीनगर, 14 डिसेंबर: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) श्रीनगर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यानं (terrorist attack) हादरलं. सोमवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला. या हल्ल्यात 2 जवान शहीद (Two soldiers were killed) झाले असून 12 जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्याप्रकरणी अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ज्या बसमध्ये जवान प्रवास करत होते ती बस बुलेटप्रूफ नव्हती. प्राथमिक माहितीनुसार, जवानांकडे शस्त्रेही नव्हती.

मिळालेल्या माहितीनुसार, पंथा चौक परिसरात दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीर सशस्त्र पोलीस दलाच्या 9 व्या बटालियनच्या बसला लक्ष्य केलं. या हल्ल्यात 2 जवान शहीद झाले, तर 12 जवान जखमी झाल्याची माहिती आहे. ज्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हेही वाचा- रात्रीचे 1.13..! बनारस स्टेशनवर दिसले पंतप्रधान मोदी, Photo झाला व्हायरल

'आजतक'नं जवानांच्या नावाची यादी दिली आहे. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे. संपूर्ण परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.

एएसआई गुलाम हसन - नंबर 861250

कॉन्स्टेबल सज्जाद अहमद - नंबर 641एपी9

कॉन्स्टेबल रमीज अहमद - नंबर 734 एपी9

कॉन्स्टेबल बिशंबर दास - नंबर 129 एपी9

एसजीसीटी संजय कुमार - नंबर 458 एपी9

एसजीसीटी विकास शर्मा - नंबर 557 एपी9

कॉन्स्टेबल अब्दुल मजीद - नंबर 399 एपी9

कॉन्स्टेबल मुदासिर अहमद - नंबर 301 एपी9

कॉन्स्टेबल रवि कांत नंबर - 719 एपी9

कॉन्स्टेबल शौकत अली - नंबर 434 एपी9

कॉन्स्टेबल अर्शीद मोहम्मद - नंबर 518 एपी9

एसजीसीटी सफीक अली - नंबर 782 एपी9

कॉन्स्टेबल सतवीर शर्मा - नंबर 657 एपी9

कॉन्स्टेबल आदिल अली - नंबर 432 एपी9

यापैकी एक एएसआय आणि एक सिलेक्शन ग्रेड कॉन्स्टेबल शहीद झाले आहे. जम्मू-काश्मीर सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांच्या बसवर तीन बाजूंनी हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दहशतवादी दुचाकीवरून आले होते.

हेही वाचा- चिंता वाढली..! Omicron चा गड ठरणार महाराष्ट्र?,  निम्म्याहून अधिक रुग्ण राज्यातच

शनिवारीही दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन पोलीस शहीद झाले होते. बांदीपोरा येथील गुलशन चौक परिसरात दहशतवाद्यांनी भ्याड कृत्य करताना पोलीस दलाला लक्ष्य केलं होतं. या हल्ल्यात मोहम्मद सुलतान आणि फयाज अहमद नावाचे दोन पोलीस गंभीर जखमी झाले, त्यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.

First published:

Tags: Jammu and kashmir, Srinagar