Home /News /national /

आरोपी महिलेने न्यायाधीशासोबतच जुळवलं सूत, आता जामिनावर लग्नही करणार!

आरोपी महिलेने न्यायाधीशासोबतच जुळवलं सूत, आता जामिनावर लग्नही करणार!

लाच घेतल्याची प्रकरणं भारतात नवी नाहीत. मात्र इथं महिला अधिकाऱ्याच्या प्रकरणाला मिळालेलं वळण अगदीच नाट्यमय आहे.

    जयपूर, 15 फेब्रुवारी : लाच घेतल्याचा आरोप (bribe) आणि त्यासाठी शिक्षा झालेली अनेक प्रकरणं आपण वाचतो. इथं मात्र अधिकाऱ्यानं लाच घेतल्यानंतर त्या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं आहे. या लाच घेतलेल्या बाईंचं आणि न्यायधीशांचंच प्रेम जमलं असून (love affair of Pinki Meena and the judge) लग्नासाठी बाईंना जामिनही मिळाला आहे. एका उपविभागीय न्यायधीश (SDM) (Sub Divisional Magistrate) बाईंवर लाच घेतल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. पिंकी मीणा असं त्यांचं नाव आहे. हायवे बनवणाऱ्या कंपनीकडून (Highway making company) 10 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्या सध्या तुरुंगात आहेत. मात्र गंमत काय, तर पिंकी मीणा या 16 फेब्रुवारीला थेट न्यायाधीशांसोबतच लग्न (going to marry the Judge) करणार आहेत. राजस्थान उच्च न्यायालयाच्या जयपूर खंडपीठाचे न्यायाधीश (Jaipur bench of Rajasthan High court) इंद्रजीत सिंह यांनी पिंकी मीणा यांना त्यासाठीच 10 दिवसांचा सशर्त जामीन (bail) दिला आहे. दौसा इथं हायवे बनवणाऱ्या कंपनीकडून पैसे घेतल्याच्या आरोपात मागच्या 29 दिवसांपासून मीणा या घाटगेट जेलमध्ये (Ghatgate jail) बंद आहेत. बुधवारी रात्री त्यांना तुरुंगातून सोडलं गेलं. पिंकी मीणा यांना महिला जेल गेटऐवजी सेंट्रल जेलच्या मुख्य  गेटमधून बाहेर काढलं गेलं. त्यांचे कुटुंबीय त्यांना घ्यायला आले होते. त्या जयपूर इथून आपलं गाव चिथवाडीला गेल्या. पिंकी यांना लग्नाच्या पाच दिवस नंतर २१  फेब्रुवारी रोजी सरेंडर करावं लागेल. या प्रकरणाची पुढील  सुनावणी 22 फेब्रुवारीला होणार आहे. हेही वाचानक्षल्यांच्या लग्नात पोलीस वऱ्हाडी; कधीच पाहिला नसेल असा लग्नसोहळा पिंकी यांनी खालच्या न्यायालयात जामीन मिळावा यासाठी अर्ज दिला होता. मात्र न्यायालयानं यासाठी नकार दिला होता. मात्र आता त्यांना उच्च न्यायालयातून लग्नाच्या सहा दिवस आधी जामीन मिळाला आहे. पिंकी या चौमू जिल्ह्यातील चिथवाडी च्या आहेत. त्यांचे वडील शेतकरी (farmer) आहेत. त्या  पहिल्याच प्रयत्नात आरएएस (RAS) अर्थात राजस्थान प्रशासकीय सेवेच्या परीक्षेत  यशस्वी झाल्या होत्या.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Jaipur, Rajasthan

    पुढील बातम्या