Home /News /national /

दिल्ली, तेलंगणानंतर जयपूरमध्येही पोहोचला ‘कोरोना’; पुण्याहून येणाऱ्या रिपोर्टची प्रतीक्षा

दिल्ली, तेलंगणानंतर जयपूरमध्येही पोहोचला ‘कोरोना’; पुण्याहून येणाऱ्या रिपोर्टची प्रतीक्षा

आत्तापर्यंत पुण्यात 1366 जणांचा मृत्यू झाला. तर 38117 जणांना डिस्चार्ज करण्यात आलं.

आत्तापर्यंत पुण्यात 1366 जणांचा मृत्यू झाला. तर 38117 जणांना डिस्चार्ज करण्यात आलं.

नवी दिल्ली, तेलंगणापाठोपाठ आता राजस्थानच्या जयपूरमध्येही (Jaipur) कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) रुग्ण आढळून आला आहे. त्याचा एक रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, आता पुण्याहून दुसरा रिपोर्ट येण्याची प्रतीक्षा आहे.

    जयपूर, 02 मार्च : भारतातही (India) आता कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) धोका वाढताना दिसतो आहे. नवी दिल्ली (New delhi), तेलंगणापाठोपाठ (Telangana) आता राजस्थानच्या जयपूरमध्येही (Jaipur) 'कोरोना'चा रुग्ण आढळून आला आहे. या रुग्णाचा एक रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, आता पुण्याहून (Pune) दुसरा रिपोर्ट येण्याची प्रतीक्षा आहे. इटलीहून (Italy) जयपूरमध्ये आलेल्या पर्यटकाला कोरोनाव्हायरस असल्याचं निदान झालं आहे. त्याच्या रक्ताच्या नमुन्याचा एक रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला तर दुसरा रिपोर्ट नेगेटिव्ह आला. त्यामुळे आता रुग्णाच्या रक्ताचे नमुने पुन्हा तपासणीसाठी पुण्याला पाठवण्यात आलेत. सवाई मानसिंग हॉस्पिटलमध्ये (SMS Hospital) या रुग्णाला विशेष विभागात ठेवण्यात आलं आहे. संबंधित - Alert! भारतात पुन्हा आला महाभयंकर 'कोरोना', 2 रुग्णांना व्हायरसची लागण राजस्थानचे आरोग्यमंत्री रघु शर्मा यांनी सांगितल्यानुसार, “कोरोनाव्हायरसची लक्षणं दिसल्यानंतर या व्यक्तीची तपासणी करण्यात आली. त्याच्या चाचणीचा एक रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर एक रिपोर्ट नेगेटिव्ह आला. त्यामुळे चाचणीसाठी त्याच्या रक्ताचे नमुने पुन्हा एकदा तपासणीसाठी पाठवण्यात आलेत. तोपर्यंत त्याला एसएमएस रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे. शिवाय त्याच्याशी संपर्कात आलेल्या  लोकांचीही चाचणी केली जाते आहे” एकाच दिवसात भारतात कोरोनाव्हायरसचे 3 रुग्ण सापडलेत, त्यामुळे भारतात पुन्हा भीतीचं वातावरण आहे. चीनहून वुहानमधून परतलेल्या भारतीयांपैकी 3 भारतीयांना कोरोनाव्हायरसची लागण झाल्याचं निदान झालं होतं. हे तिन्ही रुग्ण बरे झाले आणि आता आणखी 3 नवीन रुग्ण आलेत. देशाच्या सर्व विमानतळांवर अलर्ट भारतात आता दिसून आलेले कोरोनाचे रुग्ण चीन नव्हे तर इतर देशांमधून आलेत. चीनमधून इतर देशांमध्येही हा व्हायरस पसरला आहे आतापर्यंत 66 देशांमध्ये व्हायरस पसरल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. चीन सोडून इतर 10 देशांमध्ये या व्हायरसमुळे एकूण 139 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये इटलीमध्ये सर्वाधिक म्हणजे 54 जणांचा समावेश आहे. तर चीननंतर दक्षिण कोरियात या व्हायरचे सर्वात जास्त रुग्ण आहेत. त्यामुळे भारतातील सर्व एअरपोर्टवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. चीन, हाँगकाँग, इटली, थायलँड, सिंगापूर, मलेशिया आणि नेपाळहून येणाऱ्या सर्व प्रवाशांवरही नजर ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेत. सर्वांचे फोन नंबर आणि पत्ता घेण्याच्या सूचना देण्यात आल्यात. महाराष्ट्रात 137 पैकी 132 प्रवासी कोरोना नेगेटिव्ह राज्याच्या आरोग्य विभागानं सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, 'कोरोनाव्हायरसची लागण झाल्याची शक्यता असल्याच्या संशयातून राज्यात 137 प्रवाशांना वेगळं ठेवण्यात आलं होतं. त्यापैकी 132 प्रवाशांची चाचणी नेगेटिव्ह आली. आतापर्यंत 64,000 पेक्षा जास्त प्रवाशांची विमानतळावर तपासणी करण्यात आली आहे. चीनच्या वुहानमध्ये डिसेंबरच्या शेवटी कोरोनाव्हायरसचा उद्रेक झाला. त्यानंतर भारतानं सावध भूमिका घेतली. केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांनुसार राज्यातील विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात आली. 18 जानेवारीपासून मुंबई विमानतळावर 64,098 प्रवाशांची तपासणी झाली. संबंधित - नको रे बाबा Corona होईल ! भीतीपोटी हाताऐवजी पायाचा वापर, व्हिडीओ व्हायरल कोरोनाव्हायरसच्या रुग्णासाठी पुणे महापालिकेने विशेष व्यवस्था केली आहे. महापालिकेच्या नायडू हॉस्पिटलमध्ये 7 बेड तर ससून हॉस्पिटलमध्ये 8 बेड तयार करण्यात आले आहेत. शिवाय शहरातील खाजगी रुग्णालयातही कोरोनाच्या संशयित रुग्णासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यात महापालिकेच्या रुग्णालयात 61कोरोनाच्या संशयित रुग्णावर उपचार करून घरी सोडून देण्यात आले, अशी माहिती पुणे महापालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी सुनील वावरे यांनी दिली आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus, India

    पुढील बातम्या