मराठी बातम्या /बातम्या /देश /1 वर्षीय बाळाच्या श्वासनलिकेत अडकली मिरची; पुढे जे घडलं ते अविश्वसनीय

1 वर्षीय बाळाच्या श्वासनलिकेत अडकली मिरची; पुढे जे घडलं ते अविश्वसनीय

एक वर्षाच्या मुलाने चक्क मिरची गिळल्यामुळे त्याचा जीव धोक्यात आला होता. पण डॉक्टरांनी वेळीच एंडोस्कोपी (Jabalpur high risk endoscopy) करत या मुलाचे प्राण वाचवले आहेत.

एक वर्षाच्या मुलाने चक्क मिरची गिळल्यामुळे त्याचा जीव धोक्यात आला होता. पण डॉक्टरांनी वेळीच एंडोस्कोपी (Jabalpur high risk endoscopy) करत या मुलाचे प्राण वाचवले आहेत.

एक वर्षाच्या मुलाने चक्क मिरची गिळल्यामुळे त्याचा जीव धोक्यात आला होता. पण डॉक्टरांनी वेळीच एंडोस्कोपी (Jabalpur high risk endoscopy) करत या मुलाचे प्राण वाचवले आहेत.

  नवी दिल्ली 13 ऑगस्ट : लहान मुलांना मिळेल ती गोष्ट तोंडात टाकण्याची सवयच असते. त्यामुळे त्यांच्याकडे कायम लक्ष ठेवावं लागतं. तसेच, त्यांच्या हातात छोट्या छोट्या वस्तू येऊ नयेत याकडेही लक्ष द्यावं लागतं. तरीही कितीतरी वेळा लहान मुलांनी कॉईन्स, मार्बल्स, शेंगदाणा किंवा पेनाचं टोपण (Coin Stuck in Baby’s Throat) गिळल्याच्या घटना समोर येत राहतात. कितीतरी वेळा या गोष्टी थेट पोटात गेल्या, तर मुलांच्या जीवाला तेवढा धोका नसतो. मात्र, या गोष्टी श्वासनलिकेतच (thing stuck in baby’s windpipe) अडकल्या, तर मात्र तातडीने मुलांना रुग्णालयात दाखल करणे गरजेचे असते. जबलपूरमध्येही (Jabalpur baby ate green chilly) असाच एक प्रकार समोर आला. एक वर्षाच्या मुलाने चक्क मिरची गिळल्यामुळे त्याचा जीव धोक्यात आला होता. पण डॉक्टरांनी वेळीच एंडोस्कोपी (Jabalpur high risk endoscopy) करत या मुलाचे प्राण वाचवले आहेत. न्यूज 24 ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

  अपघातग्रस्त युवक मागत राहिला मदत पण जनता VIDEO काढण्यातच बिझी; विरारमधील घटना

  मध्य प्रदेशमधील जबलपूर शहराजवळ असणाऱ्या कटनी गावातील हे बाळ आहे. जबलपूरमधील सुभाषचंद्र बोस मेडिकल महाविद्यालयाच्या (Subhash Chandra Bose Medical College) रुग्णालयात सहा दिवसांपूर्वी एका बाळाला दाखल करण्यात आले होते. या बाळाला श्वास घेण्यास अडचण येत होती, तसेच तापही आला होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात नेले होते. रुग्णालयात त्याची संपूर्ण तपासणी करुनही डॉक्टरांना ते आजारी असण्याचं नेमकं कारण समजलं नाही. त्यानंतर या बाळाचा सीटी स्कॅनही करण्यात आला मात्र, तरीही डॉक्टरांना समजलं नाही, की कशामुळे ते बाळ आजारी आहे. यानंतर कान-नाक-घसा (ईएनटी) तज्ज्ञ डॉ. कविता सचदेवा यांनी लेझर कॅमेऱ्याच्या मदतीने बाळाच्या श्वासनलिकेची तपासणी केली. यावेळी त्यांना बाळाच्या श्वासनलिकेत मिरचीचा तुकडा (Chilly stuck in baby’s windpipe) अडकल्याचं दिसून आलं.

  अरे हिला आवरा! लग्नादिवशीच दारू ढोसतेय नवरी; VIDEO VIRAL

  डॉ. कविता यांनी त्यानंतर आपल्या सहकाऱ्यांसोबत एंडोस्कोपी (Jabalpur baby Endoscopy) करुन हा मिरचीचा तुकडा बाहेर काढला. सध्या हे बाळ रुग्णालयातच डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहे. या बाळाची प्रकृती आता सुधारत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. हे ऑपरेशन अतिशय अवघड होतं. बाळाच्या श्वासनलिकेतच हा मिरचीचा (Jabalpur baby endoscopy for chilly) तुकडा अडकला होता. एंडोस्कोपी मशीनही आम्हाला त्याच श्वासनलिकेतून टाकावं लागणार होतं. यामुळे या ऑपरेशनमध्ये मोठ्या प्रमाणात धोका होता. बाळाला वाचवण्यासाठी हा धोका पत्कारुन आम्ही अगदी काळजीपूर्वक हे ऑपरेशन यशस्वीरित्या (Successful endoscopy) पार पाडले, असे डॉ. कविता यांनी स्पष्ट केले.

  First published:

  Tags: Baby hospitalised, Operation