मुंबई, 13 ऑगस्ट : काही दिवसांपूर्वी लग्नाच्या (Wedding) दिवशी लग्नाच्या (Wedding video) ड्रेसवरच एक्सरसाईझ करणाऱ्या नवरीचा (Bride) व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या फिटनेस फ्रिक नवरीचं सर्वांनी कौतुक केलं होतं (Bride video). आता मात्र अगदी याच्या उलट अशा नवरीचा व्हिडीओ समोर आला आहे. नवरी चक्क लग्नाच्या दिवशी दारू पिताना दिसली (Bride drinking daaru).
दारू पिणाऱ्या नवरीचा व्हिडीओ (Viral video) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल झाला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही शॉक व्हाल. नटूनथटून नवरी दारू ढोसताना दिसली.
View this post on Instagram
व्हिडीओत पाहू शकता. गुलाबी लेहंगा चोली, हातात लाल चुडा आणि दागिने घालून नवरी एका खुर्चीवर बसली आहे. तिच्या शेजारी तिची मैत्रीण आहे, जिच्या हातात दारूची बाटली आहे. मैत्रीण नवरीच्या तोंडाजवळच दारूची बाटली नेते. नवरी तिला मग ग्लासमध्ये दारू द्यायला सांगते.
हे वाचा - VIDEO - ...अन् वहिनीने काठीने चोप चोप चोपलं; भीतीने आईच्या मागे दडून बसला दीर
नवरीची मैत्रीण एका ग्लासमध्ये दारू भरते आणि नवरीच्या हातात देते. नवरी दारू प्यायला जाते तेव्हा तिच्या नाकातील नथ मध्ये येते. मग एका हाताने नथ धरून दुसऱ्या हाताने दारू पिताना ती दिसते. witty_wedding इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर बऱ्याच कमेंट येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bride, Viral, Viral videos, Wedding, Wedding video