बिहार, 19 ऑक्टोबर : भाजप महिला नेता इमरती देवी यांच्यावर वादग्रस्त टिप्पणीवरुन मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर चहुबाजूंनी टिप्पणी केली जात आहे. अखेर आज एका सभेदरम्यान त्यांनी त्या वक्तव्यावरुन स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, मी कोणाचा अपमान केला नाही. ते पुढे म्हणाले की, मी नाव विसरलो होतो. मात्र शिवराज सिंह चौहान निमित्त शोधत आहे. पण कमलनाथ कधी कोणाचा अपमान करीत नाही.
कमलनाथ यांनी एका निवडणूक सभेत म्हणाले की, मी जे काही म्हणालो, तो अपमान नव्हता. मी असं काही ठरवून म्हणालो नव्हतो..मला त्या व्यक्तीचं नाव लक्षात येत नव्हतं. ज्याचं नावच लक्षात नाही त्यांना काय म्हणू मी...आज ज्याप्रमाणे आपल्या व्यासपीठावर आयनम नंबर 1 आहेत राजनारायण सिंह, आयटन नंबर 2 अजय सिंहजी...या यादीत आयटन नंबर 1, आयटम नंबर 2..आयटम नंबर 3 असं नावं आहेत. मात्र शिवराज सिंह तर कारण शोधत आहे...कमलनाथ कधी कोणचा अपमान करीत नाही...मी सत्यासह पोल खोलतो. कमलनाथ पुढे म्हणाले की, तुमच्याजवळ बोलायला काही नाही, म्हणून काहीना काही बोलत असता. तुम्ही म्हणता कमलनाथ कोका कोला पितो..हो मी पितो कोका कोला..जर कोका कोला पिणं बंद केलं तर शेतकऱ्यांची आत्महत्या थांबले की तरुणांना रोजगार मिळेल? ही भारतीय जनता पक्षाची स्थिती आहे.
हे ही वाचा-खासगी नोकरदारवर्गासाठी मोठी बातमी; दिवाळीपूर्वी सरकार आणणार नवी योजना
#WATCH I said something, it wasn't to insult anyone... I just didn't remember the (person's) name...this list (in his hand) says item no.1, item no.2, is this an insult? Shivraj is looking for excuses, Kamal Nath doesn't insult anyone, he'll only expose you with truth: Kamal Nath https://t.co/YSbqd8PHGH pic.twitter.com/rqzVWuqYTl
— ANI (@ANI) October 19, 2020
#WATCH: Our candidate is not like her... what's her name? (people shout Imarti Devi, who is former State Minister) You know her better and should have warned me earlier... ye kya item hai: Former Madhya Pradesh CM & Congress leader Kamal Nath pic.twitter.com/eW76f2z8gU
— ANI (@ANI) October 18, 2020
काल काय म्हणाले कमलनाथ
मध्य प्रदेशातील डबरामध्ये काँग्रेस उमेदवार सुंरेंद्र राजेश यांच्या प्रचारासाठी आलेल्या कमलनाथांनी भाजप उमेदवार इमरती देवी यांना आयटम म्हटले. कमलनाथ म्हणाले की, सुरेश राजेश आपले उमेदवार आहे..सरळ स्वभावाचे आणि अत्यंत साधे आहेत. हे त्यांच्याप्रमाणे नाहीत..काय नाव आहे त्यांचं? (लोक ओरडतात इमरती देवी) मी काय त्यांचं नाव घेऊ, तुम्ही तर माझ्याहून अधिक ओळखता. तुम्ही मला आधीच सावध करायला हवं होतं. हे काय आयटम आहे..हे काय आयटम आहे (हसतात)