Home /News /national /

खासगी नोकरदारवर्गासाठी मोठी बातमी; दिवाळीपूर्वी सरकार आणणार नवी योजना

खासगी नोकरदारवर्गासाठी मोठी बातमी; दिवाळीपूर्वी सरकार आणणार नवी योजना

या नव्या योजनेमुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे

    नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांच्यासोबत मिळून अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकुरदेखील कोरोना व्हायरस महासाथीमुळे नुकसान झालेल्या अर्थव्यवस्थेला बाहेर आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी सांगितले की, अर्थव्यवस्थेची स्थितीत सुधारण्यासाठी केंद्र सरकार भविष्यातही आवश्यक पावले उचलतील. याशिवाय ते म्हणाले की, लवकरच खासगी सेक्टरमधील कर्मचाऱ्यांसाठी LTC (Leave Travel Allowances) लाभावरील चित्र स्पष्ट करण्यात येईल. नुकतेच प्रोत्साहन (Stimulus) भत्त्याबाबत त्यांनी सांगितले होते की, गरीब आणि वंचितांना मदत पोहोचविणे ही सरकारची इच्छा आहे. या पॅकेजची घोषणा सध्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असली तरी हा खर्च अशा वस्तूंवर होणार आहे, ज्याचा लाभ छोट्या व्यापाऱ्यांना मिळू शकेल. खासगी सेक्टरच्या LTA बाबत केव्हा येईल स्पष्टता? खासगी सेक्टरच्या कर्मचाऱ्यांना LTA लाभ देण्याबाबत ते म्हणाले की, लवकरच त्या कर्मचाऱ्यांबाबत स्पष्टीकरण देण्यात येईल, ज्यांनी नवीन टॅक्स प्रणालीचा स्वीराप केला आहे, किंवा ज्यांनी पूर्वीच LTA चा लाभ घेतला आहे. येणाऱ्या आठवड्यात याबाबत स्पष्टीकरण दिलं जाऊ शकतं. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत अनुराग ठाकूर यांनी दोन्ही प्रोत्साहन पॅकेज आणि अर्थव्यवस्थेवर याच्या परिणामाबाबत मोठं चित्र पाहण्याची गरज आहे. यावर टीका तर होणारच. भारत हा एकमेव असा देश आहे, जेथे 8 महिन्यांसाठी 80 कोटी लोकांना मोफत अन्न देण्यात आलं. याशिवाय गरीब वर्गांच्या बँक अकाऊंटमध्ये 68000 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहे. याशिवाय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकांसाठी अनेक पाऊले उचलण्यात आली आहे. हे ही वाचा-दुकानदार कॅरी बॅगचे जास्त पैसे घेतो? आता इथं करा तक्रार; होणार कारवाई ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या स्थितीत सुधार ग्रामीण अर्थवयवस्थेबाबत (Rural Economy) ठाकुर यांनी या मुलाखतीत सांगितले की, येथील अर्थव्यवस्थेची स्थिती चांगली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेत केवळ मनरेगा याचाच समावेश नाही. इन्फ्रास्ट्रक्चर स्तरावर येथे काम होत आहे, ज्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी मिळतील. ग्रामीण भागात आता ट्रॅक्टर, मोटरबाइक्स, चार चाकी गाडी आणि घरांची मागणी वाढत आहे. आता लोक यावरही खर्च करीत आहेत.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Nirmala Sitharaman, Scheme

    पुढील बातम्या